नाशिकमध्ये सिन्नर, संगमनेरहून टोमॅटोची सर्वाधिक आवक; प्रतिजाळीला 'इतका' भाव

tomato.jpg
tomato.jpg

नाशिक : (म्हसरूळ) पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. १२) झालेल्या लिलावात टोमॅटोच्या प्रतिक्रेटला अकराशे एकवीस रुपये, तर कांद्यास दोन हजार ७५०, बटाटा- दोन हजार ८००, लसूण- अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. 

लसूण ११ हजार क्विंटल 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत निफाड, दोडी, संगमनेर व सिन्नरहून टोमॅटोची आवक होत आहे. यात सर्वाधिक टोमॅटोची आवक सिन्नरहून होत आहे. शुक्रवारी (ता.१२) ३१ हजार ५५० क्रेट आवक झाली असून, किमान दर ३५० रुपये, तर कमाल दर एक हजार १२१ रुपये मिळाला असून, सरासरी ८०० रुपये प्रतिजाळी भाव मिळाला. पावसाने ओढ दिल्याने टोमॅटो उत्पादनात वाढ झाली असून, आवकही कमी-जास्त होत असते. तसेच कांदा आवक एक हजार ८५३ क्विंटल झाली असून, किमान ४००, कमाल दोन हजार ७५०, तर सरासरी दोन हजार ३०० रुपये, बटाटा आवक ही ६९० क्विंटल झाली असून, किमान- दोन हजार, कमाल- दोन हजार ८००, तर सरासरी दोन हजार २०० रुपये भाव मिळाला. 

शेतकऱ्यांना अडचणी असल्यास संपर्क साधावा - सभापती 

लसूण आवक तीन क्विंटल झाली असून, किमान ५५००, कमाल ११०००, तर सरासरी आठ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, लिलाव प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणी व समस्या असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com