यंदा ज्येष्ठ विश्‍वस्तांची आषाढीवारी गावातच...कारण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

लॉकडाउनमुळे ज्येष्ठांच्या प्रवासाला प्रतिबंध असल्याने त्र्यंबकेश्‍वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानतर्फे पंढरपूर येथील आषाढीवारीसाठी बारा जणांची नावे देण्यात आली आहेत. त्यात 65 वर्षांवरील विश्‍वस्तांची नावे देवस्थानने वगळली आहेत.

नाशिक : लॉकडाउनमुळे ज्येष्ठांच्या प्रवासाला प्रतिबंध असल्याने त्र्यंबकेश्‍वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानतर्फे पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी बारा जणांची नावे देण्यात आली आहेत. त्यात 65 वर्षांवरील विश्‍वस्तांची नावे देवस्थानने वगळली आहेत. 

वाहनवारीत ज्येष्ठांना डच्चू मिळणार

देवस्थानतर्फे दोन- तीन दिवसांपासून पंढरपूर वारीत सर्व विश्‍वस्तांना वारीसाठी नेले जावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री, प्रांताधिकारी व तहसीलदारांनाही याबाबत साकडे घातले होते. मात्र लॉकडाउन काळातील नियमामुळे 65 वर्षांवरील ज्येष्ठांच्या प्रवासाला प्रतिबंध असल्याने आणि शासन स्तरावर अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याने अखेर ज्येष्ठ विश्‍वस्तांना डावलून देवस्थानने 12 जणांची यादी तहसील कार्यालयाला दिली आहे. त्यामुळे यंदा वाहनवारीत ज्येष्ठांना डच्चू मिळणार हे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

कोण जाणार आषाढीवारीला 

पवनकुमार भुतडा (अध्यक्ष), संजय धोंडगे (पालखीप्रमुख), जिजाबाई लांडे, पंडित कोल्हे, योगेश गोसावी (विश्‍वस्त) सच्चिदानंद गोसावी (पुजारी), बाळकृष्ण डावरे (मानकरी), निवृत्ती मेमाणे (चोपदार), अर्जुन गाढवे (विणेकरी), संदीप शिंदे (व्यवस्थापक), गणेश बागूल (झेंडेकरी), दादा आचारी (कर्मचारी).  

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashadhiwari of senior trustees in the village itself nashik marathi news