अभिमानास्पद! राज्यातील ५० खाजगी बी-स्कूलमध्ये नाशिकच्या 'या' शाळेला मानांकन..

ashoka 1.jpg
ashoka 1.jpg
Updated on

नाशिक / डीजीपी नगर : नाशिकसाठी मानाचा क्षण म्हणजे अशोका बिझनेस स्कूल या व्यवस्थापन महाविद्यालयाला एज्युकेशन वर्ल्ड इंडिया प्राइव्हेट हायर एज्युकेशन रँकिंग (ईडब्ल्यूआयपीएचईआर) द्वारे घेतलेल्या सर्वेक्षणात सन२०२०-२१ 2 साठी भारतातील सर्वोच्च १०० खाजगी बी-स्कूलमध्ये ४२ वे तर महाराष्ट्रात १७ वे स्थान मिळाले आहे अशी माहिती संस्थेचे संचालक (उच्च शिक्षण) डॉ. डी. एम. गुजराथी यांनी दिली. 

शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, 'गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत अल्पावधीतच ६३ व्या स्थानावरून ४३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रथा चालू ठेवण्यासाठी संस्था अधिक प्रयत्नशील राहणार आहे', असे आश्वासन त्यांनी दिले

राज्यातील  प्रथम ५० खाजगी बी-स्कूलमध्ये मानांकन

या एजन्सी कडून देशभरातील सर्वोच्च १०० खाजगी विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये, बी-स्कूल्स, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये इत्यादींची गुणवत्तेप्रमाणे क्रमवारी लावण्यासाठी देशांतर्गत वार्षिक सर्वेक्षणांचे आयोजन केले जाते. या एजन्सी मार्फत शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन नमुना निवड पद्धतीने प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झालेल्या उत्तरांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून करते. हे मूल्यांकन हे शैक्षणिक संस्थांकडून कोणत्याही प्रकारच्या माहिती अथवा पुराव्यांवर अवलंबून न राहता उच्च शिक्षणाच्या  उत्कृष्टतेच्या १०-१२ मापदंडांच्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या जसे की,  उद्योग प्रतिनिधी,  निर्धारीत संस्थांचे अनुभव, प्राध्यापक कौशल्य व क्षमता, संशोधन,  नेतृत्व, प्रवेश / निवड प्रक्रिया, अभ्यासक्रमातील विविधता इत्यादी  मापदंडांच्या आधारे मूल्यांकन करते. 

प्रमाणाच्या आधारावर मानांकने निश्चित
एज्युकेशन  वर्ल्ड इंडिया प्राइव्हेट हायर एज्युकेशन क्रमवारी ही वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे.सर्वे हा दिल्ली-आधारित सेंटर फॉर फॉरकास्टिंग अँड रिसर्च प्रा. लिमिटेड (सी फोर एस्टब.२०००)यांच्यामार्फत केला जातो. या सर्वेक्षणात एजन्सीने देशातील विविध बी-स्कूलमधील प्राध्यापक, उद्योग जगतातील तज्ञ् मंडळी इत्यादी  जणांची मते विचारत घेतली तसेच त्यांच्या मुलाखतीही घेतल्या.  नेतृत्व, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीयत्व, अभ्यासक्रम आणि अध्यापन, इंडस्ट्री इंटरफेस आणि प्लेसमेंट इत्यादी च्या प्रमाणाच्या आधारावर मानांकने निश्चित केली. प्रत्येक निकषांतर्गत उत्तरदात्यांनी दिलेला गुणांक प्रत्येक श्रेणीच्या आंतर संस्थेमध्ये क्रमवारीत ठेवण्यात आला. 

अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, सह सचिव  श्रीकांत शुक्ल, बिझसोल कंपनीचे संचालक   व्ही.आर.वेंकीटाचलम, संचालक (उच्च शिक्षण) डॉ. डी. एम. गुजराथी,  सहाय्यक संचालक (उच्च शिक्षण) डॉ. नरेंद्र तेलरांधे, महाविद्यालयाची माजी विदयार्थीनी स्नेहा अवस्थी (विद्यापीठ सुवर्णपदक विजेती) , महाविद्यालयातील विद्यार्थी व पालक यांनी  महाविद्यालयाच्या सहाय्यक संचालिका डॉ. रुपाली खैरे  तसेच डॉ. विकास गौंडारे, सर्व प्राध्यापक वृंद  आणि  कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले. शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com