पिडीतांच्या वेदना, अश्रू, भावनांचा तुटला बांध! कॉंग्रेसच्या महिला सभापतींचा स्केचमधून "हाथरस" प्रकरणाचा निषेध

संपत देवगिरे
Tuesday, 13 October 2020

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने सगळा देश हादरला आहे. देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येतोय. दुर्दैवी घटनेवर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या कॉंग्रेस पक्षाच्या सभापती, आर्कीटेक्‍ट अश्‍विनी आहेर यांनी चित्र काढून आपला निषेध व्यक्त केला आहे.हे चित्र त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

नाशिक : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने सगळा देश हादरला आहे. देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येतोय.दुर्दैवी घटनेवर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या कॉंग्रेस पक्षाच्या सभापती, आर्कीटेक्‍ट अश्‍विनी आहेर यांनी चित्र काढून आपला निषेध व्यक्त केला आहे.हे चित्र त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

पिडीतांच्या वेदना, अश्रू, भावनांचा फुटला बांध!

हे स्केच अतिशय बोलके आहे. मास्टर इन आर्कीटेक्‍ट ही पदवी असलेल्या आहेर यांनी यापूर्वीही देशातील महिला अत्याचार, शोषणावर चित्रातून आपली प्रतिक्रीया व निषेध व्यक्त केला आहे. हाथरस प्रकरणात महिला लक्ष्य ठरल्या. देशात अशा घटना सतत घडत असतात. एकीकडे समाज शिक्षीत झाल्याचा दावा केला जातो. यामध्ये विविध वयोगटातील महिलांचे रक्ताचे अश्रू आणि प्रतिकारासाठी पुढे आलेले लहान मोठे हाथ चहु बाजुंनी होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार, प्रतिबंध करीत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यादृष्टीने या स्केचमधील वेदना व्यक्त करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

प्रशासन देखील भावनाशुन्य वागत आहे - आहेर

यासंदर्भात आहेर म्हणाल्या, हाथरसची घटना घडली. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. मात्र त्यानंतरही उत्तर प्रदेशात अशी घटना घडल्या. यामध्ये लहान मुली, तरुणी अन्‌ अगदी प्रौढ महिलांना देखील या संकटांतून सुटका करुन घेता आलेली नाही. एकविसाव्या शतकातील ही स्थिती आहे. त्यावर आपण किती बोलणार?. काय बोलणार?. किंबहूना बोलणार तरी कसे? या प्रश्‍नांमुळे त्यावर निषेध करण्याचा एक प्रकार म्हणून हे स्केच काढले आहे. हे स्केच विविध महिलांचे प्रतिनिधीत्व करते, तसेच या दुर्दैवी घटना थांबणार केव्हा, असा संदेश त्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच महिलांच्या या प्रतिनिधीक भावना आहेतमात्र त्यात संस्काराचा अभाव असल्याचे वेळोवेळी घडणाऱ्या हाथरस सारख्या प्रकरणातून दिसते. त्याबाबत पोलिस, प्रशासन हे देखील भावनाशुन्य वागत असल्याने पिडीतेची वेदना त्यांनी चित्रातून व्यक्त केली आहे.

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwini Aher protests Hathras incident from sketch nashik marathi news