esakal | ''नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही''; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा द्राक्ष उत्पादकांना धीर 
sakal

बोलून बातमी शोधा

zirwal grapes 1.jpg

"मीदेखील शेतकरी आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती जरी गंभीर असली तरी शेतकरीही महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व शरद पवार यांच्याशी बोलून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळून देऊ"

''नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही''; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा द्राक्ष उत्पादकांना धीर 

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्यासमोरच अवकाळी पाऊस पडत होता, मीदेखील शेतकरी आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती जरी गंभीर असली तरी शेतकरीही महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व शरद पवार यांच्याशी बोलून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळून देऊ, अशी ग्वाही विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही 

नळवाडी, निगडोळ, पाडे, निळवंडी, मोहाडी, खडक सुकेणे, चिंचखेड, मावडी, अहिवंतवाडी, हस्तेदुमाला आदी ठिकाणी नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी झिरवाळ यांनी केली. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. 
तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी झिरवाळांपुढे अनेक समस्या मांडल्या. दोन वर्षांपासून आम्ही या संकटाला तोंड देत आहे. मागील वर्षीही कोरोनामुळे द्राक्षबागेचा हंगाम वाया गेला.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

त्यातून आम्ही कसातरी मार्ग काढून चार महिन्यांपासून वातावरणात होणाऱ्या बदलाचा सामना करून द्राक्षबागा वाचविल्या होत्या. मात्र, आता अवकाळी पावसाने आमचे मोठे नुकसान झाले आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. या वेळी झिरवाळ यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना दिले.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा