esakal | विकृती थांबता थांबेना! एकविसाव्या शतकातही 'ती' ठरतेय अन्यायाची शिकार
sakal

बोलून बातमी शोधा

woman 1234.jpg

गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. स्त्रियांवरील अन्याय तसेच अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्य आहे ती जनजागृती. स्त्रियां- मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे.

विकृती थांबता थांबेना! एकविसाव्या शतकातही 'ती' ठरतेय अन्यायाची शिकार

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. स्त्रियांवरील अन्याय तसेच अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्य आहे ती जनजागृती. स्त्रियां- मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. 

अल्पवयीन मुली​वर अत्याचार करीत केले गर्भवती

मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने तिच्यावर अत्याचार केला. द्याने (ता. मालेगाव) येथील चंद्रमणीनगर भागातील सोळावर्षीय युवतीला संशयित आशिष पगारे (२३, रा. पंचशीलनगर कॅम्प) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत तिला गर्भवती केले. संशयित आशिष विरुद्ध रमजानपुरा पाेलिसांनी लैंगिक अत्याचार, बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अटक केली. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

विवाहितेचा छळ 
मालेगाव : शहरातील आनंदनगर भागातील विवाहिता नीता पगारे हिने माहेरून घरखर्चासाठी चार लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा छळ करणाऱ्या पती मनोज पगारे, सासरे बाळू पगारे आदींसह सासूकडच्या मंडळींविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला. दोन महिन्यांपासून पतीसह सर्व संशयित पैशासाठी विवाहितेस मारहाण, छळ करीत होते. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

दहा लाखांसाठी छळ 
मालेगाव : शहरातील कृषिनगर भागातील माहेरवाशीण नीलम तांबट (३८, रा. कामोठे, ता. पनवेल) हिचा माहेरून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी छळ करणाऱ्या पती ओमप्रकाश तांबट (रा. कामोठे, ता. पनवेल) याच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला. पतीने मारहाण करून घराबाहेर काढून दिले.