ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; बिट मार्शलमुळे फिस्कटला डाव

राजेंद्र बच्छाव
Monday, 21 September 2020

बिट मार्शल दिनेश पाटील रात्री दीड वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात गस्त घालत असताना पाथर्डी -देवळाली रस्त्याला लागुन असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम चेक करण्यासाठी गेलेे असता त्या शॉप मधून दोन इसम त्यांना बघून वासननगरच्या दिशेने पळाले. पाटील यांनी त्यांचा पाठलाग केला असता ते पळुन गेले.

नाशिक / इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न बीट मार्शल च्या समय सुचकतेमुळे अयशस्वी झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. नेमके काय घडले वाचा सविस्तर...
 

ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिट मार्शल दिनेश पाटील रात्री दीड वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात गस्त घालत असताना पाथर्डी -देवळाली रस्त्याला लागुन असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम चेक करण्यासाठी गेलेे असता त्या शॉप मधून दोन इसम त्यांना बघून वासननगरच्या दिशेने पळाले. पाटील यांनी त्यांचा पाठलाग केला असता ते पळुन गेले. दरम्यान त्यांनी मदतीकरिता नियंत्रण कक्षाला कळवले. त्यामुळे अंबड आणि इंदिरानगरचे अधिकारी, पोलीस पीटर मोबाईल, सी आर मोबाईल, डीबी मोबाईल, बीट मार्शल आदी कर्मचारी येथे पोचले. सर्वांनी परिसरात चोरट्यांचा कसून शोध घेण्यास सुरवात केली. तेंव्हा उद्यानाजवळ लपून बसलेल्या रुपेश शिवाजी कहार ( 21 ) रा. कृष्णानगर, ढोकणे मळा गोपाल पार्क, अंबड याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. त्याने सोबत चार मित्र होते आणि एटीएम मशीन तोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याकरता आलो होतो असे सांगितले.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

चोरट्यांचा कसून शोध
त्याच्याकडून गुन्ह्यात एटीएम फोडण्यासाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली.  इतर चौघांची नावे पोलिसांनी त्याच्याकडून  मिळवली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलेश माईनकर,अंबडचे निरीक्षक निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक राकेश भामरे, पाळदे, अखलाक शेख, जावेद खान, किसन गिधाडे, अमोल सोनार, किरण डुमणे,अंबड पोलिस स्टेशनचे डीबीचे कर्मचारी मारुती गायकवाड,  हेमंत आहेर यांनी ही कामगिरी बजावली.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to robbery Axis Bank ATM indiranagar nashik marathi news