भाजीविक्रेत्यांची राजकारणामुळे फरपट; आकाशवाणी टॉवर भाजी बाजाराचा लिलाव तिसऱ्यांदा स्थगित 

विक्रांत मते
Friday, 23 October 2020

तीन भाजप व एक शिवसेनेचा नगरसेवक असलेल्या प्रभाग सातमधील आकाशवाणी टॉवरजवळ एआरअंतर्गत भाजी बाजाराची उभारणी करण्यात आली. वर्षभरापासून या ओट्यांच्या वाटपांवरून घोळ सुरू आहे.

नाशिक : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळच्या भाजी बाजाराचा लिलाव कोरोनाचे निमित्त पुढे करून तिसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडीतील श्रेयवादाच्या लढाईमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आता ४ नोव्हेंबरला लिलाव पद्धतीने १४५ ओट्यांचे वाटप केले जाईल. 

तीन भाजप व एक शिवसेनेचा नगरसेवक असलेल्या प्रभाग सातमधील आकाशवाणी टॉवरजवळ एआरअंतर्गत भाजी बाजाराची उभारणी करण्यात आली. वर्षभरापासून या ओट्यांच्या वाटपांवरून घोळ सुरू आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विक्रेत्यांच्या बाजूने आंदोलन केल्याने त्यांना श्रेय मिळू नये म्हणून भाजपच्या तिन्ही नगरसेवकांनी यापूर्वी झालेली लिलावप्रक्रिया बेकायदा ठरवत रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रक्रिया रद्द करण्यात आली. लॉकडाउनमुळे मार्चमध्ये होणारी ओटे वाटपाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. ओटे नसल्याने विक्रेते रस्त्यावर बसू लागल्याने 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

गर्दी होऊ लागली. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने कोरोनाची भीती निर्माण झाली. महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागप्रमुख किशोर शिरसाठ यांनी जुलैत फेरलिलावासाठी पाठपुरावा केला. त्या वेळी ओटे व गाळ्यांचे वाटप करण्यात आल्यानंतर वाद पुन्हा उफाळला. भाजपच्या नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके, योगेश हिरे, स्वाती भामरे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे आक्षेप नोंदवीत फेरलिलावाची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी (ता. २२) लिलावाद्वारे ओटेवाटपाचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला होता. कोरोना व शहरात जमावबंदीचे आदेश असल्याने पुन्हा एकदा लिलाव पुढे ढकलण्यात आले. परंतु लिलाव पुढे ढकलण्यामागे राजकीय कारण असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auction of vegetable market postponed again in nashik marathi news