आता टपाल पाकिटांद्वारे होणार 'प्लाझ्मा थेरपी'बाबत जनजागृती; कोरोनायोद्ध्यांचा सन्मान 

युनूस शेख 
Sunday, 18 October 2020

टपाल विभागच्या ‘फर्स्ट डे’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध संकल्पनेवर आधारित टपाल तिकिटे किंवा पाकिटे तयार केले जातात. त्याचे संग्रहकार व्यक्ती जतन करतात. कोरोना काळाचे महत्त्व लक्षात घेऊन गोवा आणि पुणे टपाल विभागांकडून ‘प्लाझ्मा दान’ या संकल्पनेवर आधारित पाकिटे तयार केली आहेत.

टपाल पाकिटांवर आता प्लाझ्मा थेरपीबाबत जनजागृती 
छायाचित्रे, माहितीचे मुद्रण; कोरोनायोद्ध्यांचा सन्मान 

जुने नाशिक : टपाल विभागच्या ‘फर्स्ट डे’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध संकल्पनेवर आधारित टपाल तिकिटे किंवा पाकिटे तयार केले जातात. त्याचे संग्रहकार व्यक्ती जतन करतात. कोरोना काळाचे महत्त्व लक्षात घेऊन गोवा आणि पुणे टपाल विभागांकडून ‘प्लाझ्मा दान’ या संकल्पनेवर आधारित पाकिटे तयार केली आहेत. शहरातील जीपीओ टपाल कार्यालयातही ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्लाझ्मा थेरपीसंदर्भातील माहिती, छायाचित्र मुद्रित करून त्याद्वारे जनजागृती केली जात आहे. 

ग्रामीण भागात पोहचणार माहिती

कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव आहे. आजारापेक्षा त्याची भीती नागरिकांमध्ये अधिक आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सामान्य उपचार पद्धतीप्रमाणे प्लाझ्मा थेरपीवर सध्या भर दिला जात आहे. परंतु प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय, त्याची गरज काय, या प्रश्नांची उत्तरे ग्रामीण भागात सर्वसामान्यांना माहीत नसतात. या थेरपीची व प्लाझ्मा दानाची माहिती प्रत्येकास व्हावी, यासाठी पुणे टपाल विभागाने ‘प्लाझ्मा दाता-उत्तम योद्धा’ तसेच गोवा विभागाने ‘प्लाझ्मा दान-जीवनदान’ अशा आशयाचे टपाल पाकीट तयार केले आहे. पाकिटाच्या समोरील बाजूस थेरपीबाबतचे संदेश, प्रतीकात्मक छायाचित्र तर मागील बाजूस प्लाझ्मा थेरपीची हिंदी आणि इंग्रजीत माहिती दिली आहे. हे पाकीट कोरोनायोद्धांच्या सन्मानासाठी तयार केल्याचे नमूद केले आहे. देशाच्या विविध शहरांच्या टपाल विभागांत ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? 

प्लाझ्मा थेरपी म्हणजे एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण होऊन योग्य उपचारानंतर तो पूर्णपणे बरा होतो. औषधोपचारामुळे त्याच्या शरीरात अर्थात, रक्तात ॲन्टीबॉडी तयार होते. त्या ॲन्टीबॉडी कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यास मदत करतात. अनेक जण या उपचारपद्धतीमुळे बरे झाले आहेत. भविष्यात ही पद्धत अनेकांना जीवदान देऊ शकते. 

पाकीट तयार करण्याचा उद्देश 
- प्लाझ्मा थेरपीची जनजागृती व्हावी 
- प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या वाढावी 
- टपाल पाकीट आणि तिकिटांच्या संग्रहात भर पडावी 
- संग्राहातून विविध माहिती जतन करून ठेवण्यास उपयोगी 
- कोरोनायोद्धांच्या सन्मानार्थ

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness about plasma therapy on postal envelopes nashik marathi news