अपघात टाळण्याकरिता महामार्ग पोलिसांची जनजागृती; कुठे ते वाचा

ganur.jpg
ganur.jpg

नाशिक : (गणुर) महामार्ग पोलीस मदत केंद्र पिंपळगाव (ब) यांचेकडून राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली शाळा, महाविद्यालये, कारखाने, बाजार, टोलनाके इत्यादी ठिकाणी वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवार (ता.१८) रोजी सोग्रस (ता. चांदवड) येथील आकाशवीर(Avee) बॉयलर कंपनीत जनजागृती करण्यात आली.

रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावले

कंपनीमध्ये जाऊन तेथील कामगार तसेच वाहनचालक यांना वर्षा कदम प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस (विभाग पिंपळगाव) यांनी वाहतूक नियमांविषयी सखोल मार्गदर्शन केले. वाहन विम्याचे महत्त्व समजावून सांगून, अपघातग्रस्तांना तातडीने मदत प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य आहे. याबाबत जाणीव करून देऊन सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाच्या अनुषंगाने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाणार नाही. कंपनीतील दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या सर्व कामगारांना कंपनी प्रशासनाच्या वतीने हेल्मेट पुरविण्याबाबत तसेच विना हेल्मेट कोणीही कामगार या कंपनीमध्ये प्रवेश मिळणार नाही. याबाबत कंपनीचे संचालक यांनी मान्यता दर्शविली असून लवकरच सदर निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. याबाबत आश्वासित केलेले आहेत. 
सदर वेळी कंपनीतील मालाची वाहतूक करणाऱ्या ये-जा वाहनांना रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. 

कायदेशीर कारवाईबाबतची माहिती 

जड वाहने महामार्गावर लेनची शिस्त पाळावी तसेच, मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळावा. या अनुषंगाने सूचना देऊन कायदेशीर कारवाईबाबतची थोडक्यात माहिती दिली. E-challan डिवाइस मशीन, स्पीड गन, Tint meterआधुनिक साधनविषयी वाहनधारकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी कंपनीचे संचालक गांगुर्डे, सुपरवायझर चव्हाण, मॅनेजर, वाहनचालक तसेच, कंपनीचे कामगार असे सुमारे 50 ते 60 लोक उपस्थित होते. महामार्ग पोलीस विभागाकडील पोलीस हवालदार रायभोळे, घोलवड, सय्यद, पोलीस नाईक उमेश सानप, जगताप, गोधडे , गुंजाळ, मुलमुले, शिंदे आदींनी कार्यक्रम यशस्वीत्यासाठी प्रयत्न केले. 

माझ्याविना माझे कुटुंब कसे असेल!

केवळ कायदेशीर कारवाई करणे हा उद्देश नसून रोडवरील अपघात कमी होऊन जीवितहानी होऊ नये. याकरिता जास्तीत जास्त वाहनचालकांपर्यंत पोहोचून 'माझ्याविना माझे कुटुंब कसे असेल' याची केवळ कल्पना करून सर्वच लोकांनी जास्तीत जास्त वाहतूक नियम पाळावेत. असे भावनिक विनम्र आवाहन महामार्ग पोलीस विभागातर्फे मी सर्व नागरिकांना करीत आहे. - वर्षा कदम, प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com