हद्दच झाली! पोलीस ठाण्यातच महिलेने आवळला गळा; पोलीसही भांबावले

प्रमोद सावंत
Thursday, 13 August 2020

मालेगावातील आझाद नगर पोलीस ठाण्यात महिलेने तर हद्दच पार केली. वाद मिटविण्यासाठी आलेल्या महिलेने चक्क असा काही प्रकार केला की पोलीसही भांबावले. काय घडले नेमके?

नाशिक / मालेगाव : मालेगावातील आझाद नगर पोलीस ठाण्यात महिलेने तर हद्दच पार केली. वाद मिटविण्यासाठी आलेल्या महिलेने चक्क असा काही प्रकार केला की पोलीसही भांबावले. काय घडले नेमके?

काय घडले नेमके?

मालाबाई व लता बागूल यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले. दोघी महिला पोलिस ठाण्यात वाद मिटविण्यासाठी आल्या. दोघा महिलांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच मालाबाईने स्वत:च्या स्कार्पने गळा आवळून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (ता. ११) दुपारी हा प्रकार घडला. महिला पोलिसांनी तिला रोखले. या प्रकाराने पोलिस मात्र गोंधळून गेले. आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. पोलिस शिपाई नितीन अजगे यांच्या तक्रारीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात या महिलेविरद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला जामिनावर सोडून दिले. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

गुन्हा दाखल

शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यातील दस्तऐवज खोलीनजीक गळ्यास स्कार्प आवळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मालाबाई जेठे (वय ४१, रा. नारायणवाडी, चाळीसगाव) या महिलेविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Azad nagar Police Station Woman attempted suicide malegaon nashik marathi news