बाजार समितीत रंगला ''संविधान जागर"; निमित्त होते बळीराजा गौरव दिनाचे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

शहरात सर्व पुरोगामी पक्ष-संघटना "बळीराजा गौरव दिन" बलिप्रतिपदेच्या दिवशी साजरा करण्यात आला. बहुजन-कष्टक-यांच्या सांस्कृतिक गौरवाचे प्रतिक म्हणून बहुजनांच्या नेणिवेत दफन झालेल्या बळीराजाच्या समतेच्या, आदर्श राज्याच्या संकल्पनेची कामना यावेळी करण्यात आली.

नाशिक : सोमवारी (ता.17) शहरात सर्व पुरोगामी पक्ष-संघटना "बळीराजा गौरव दिन" बलिप्रतिपदेच्या दिवशी साजरा करण्यात आला. बहुजन-कष्टक-यांच्या सांस्कृतिक गौरवाचे प्रतिक म्हणून बहुजनांच्या नेणिवेत दफन झालेल्या बळीराजाच्या समतेच्या, आदर्श राज्याच्या संकल्पनेची कामना यावेळी करण्यात आली.

बळीराजा गौरव दिन घराघरात साजरा व्हावा

यावेळी "संविधानप्रेमी नाशिककर"समितीच्या वतीने भव्य रांगोळी व "संविधान जागर"हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच बळीराजा गौरव दिन घराघरात साजरा व्हावा. यासाठी शेतकरी, परिवर्तन वादी, संविधान प्रेमी नागरीक नि पुढाकार घ्यावा असे आवाहन महादेव खुडे परिवर्तनवादी साहित्यीक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे आयोजित संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीने बळीराजा गौरव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मते राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. विचारमंचावर शेतकरी नेते रमेश औटे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक संविधान प्रेमी नाशिककराचे निमंत्रक राजू देसले यांनी केले.  याप्रसंगी विद्रोही गीते स्रावसी मोहिते, संविधान गांगुर्डे, किरण मोहिते, प्रभाकर वायचळे, सागर निकम आदींनी सादर केली.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मते यांनी या पुढील काळात बळीराजा गौरव महोत्सव गावागावात सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. घंटागाडी कर्मचारी कन्या आरती कनोजे हिने बळीराजाची भव्य रांगोळी काढली होती. तिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अॅड नाजीम काझी, आसिफ शेख, पद्माकर इंगळे, संतोष जाधव, सविता जाधव, तलाहा शेख, गोराणे, रामदास भोंग, किरण बोरसे, कावेरी, नितीन शिराळकर, कैलास मोरे, शिवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baliraja Gaurav Din was celebrated in Nashik market committee nashik marathi news