बांग्लादेशींसाठी बनावट पासपोर्ट प्रकरण : एकावर गुन्हा दाखल; संशयिताच्या घरी सापडले बनावट दस्तावेज

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 6 November 2020

बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट आधारकार्ड, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्र बनविणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या दलालांकडे मालेगावातील विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांची लेटरहेड सापडल्याने खळबळ उडाली होती.

मालेगाव (नाशिक) : बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट आधारकार्ड, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्र बनविणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या दलालांकडे मालेगावातील विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांची लेटरहेड सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी मालेगावातील एक आरोपी साजिद अख्तर हैदर खान (वय ५० रा. रविवार वार्ड) याच्यावर मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्या मालेगावातील घराची झडती घेतली असता अनेक बनावट दस्ताऐवज सापडले आहेत.

आजी-माजी आमदारांचे लेटरहेड सापडल्याने खळबळ

बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट आधारकार्ड, पासपोर्ट तसेच इतर कागदपत्र बनविणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील आजी-माजी आमदारांचे लेटरहेड देखील सापडल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही आमदारांनी त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी देखील कारवाई केली आहे.

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

अनेक बनावट दस्ताऐवज सापडले

किल्ला पोलिस ठाण्याचे निरीक्षक पठाडे यांच्यासह पथकाने ३ नोव्हेंबरला आरोपी साजिदच्या घराची झडती घेतली. यावेळी घरात बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशनकार्ड बनवण्यासाठी वापरण्यात येणारे बनावट दस्तावेज आढळून आले. 

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangladeshi passport case filed malegaon nashik marathi news