बँक कर्मचाऱ्याची पैशांची बॅग लांबविली; बोकटेजवळ दिवसाढवळ्या घडलेली घटना

संतोष विंचू
Friday, 27 November 2020

तिळवणी, सावळणी या दोन गावांतील बँक कलेक्शन करून अंदरसूलकडे येत होते. त्याच वेळी सावळगावकडून पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी गांगुर्डे व शेळके यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. त्याच वेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गांगुर्डे व शेळके यांना कोयत्याचा धाक दाखवला.

येवला (जि.नाशिक) : सावळगाव ते बोकटे रस्त्यावर दोघांनी मोटारसायकल चालकाला खाली पाडून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेच्या कलेक्शनची २७ हजार ४०० रुपयांची बॅग चोरट्यांनी दिवसाढवळ्या जबरीने चोरून नेली.

पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी दिला जोराचा धक्का 

गुरुवारी (ता.२६) सकाळी साडेनऊला हा प्रकार घडला. पंकज गांगुर्डे (रा. मनमाड) व श्री. शेळके हे दोघे बँक कर्मचारी मोटारसायकलवरून (एमएच ४१ एएन ०११९) तिळवणी, सावळणी या दोन गावांतील बँक कलेक्शन करून अंदरसूलकडे येत होते. त्याच वेळी सावळगावकडून पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी गांगुर्डे व शेळके यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. त्याच वेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गांगुर्डे व शेळके यांना कोयत्याचा धाक दाखवून बँकेच्या कलेक्शनची २७ हजार चारशे रुपयांची बॅग पळविली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank employee money bag theft nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: