VIDEO: लक्षवेधी फलकामुळे 'बैलजोडी'ची सर्वदूर चर्चा...एकदा बघाच

That banner on bulls are discusses everywhere nashik marathi news
That banner on bulls are discusses everywhere nashik marathi news
Updated on

नाशिक/इंदिरानगर : दरवर्षी बैल पोळा सणानिमित्त बैलांच्या सजावटी दरम्यान लक्षवेधी फलक वापरणाऱ्या पिंपळगाव खांब येथील सोमनाथ बोराडे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांची 'मोडून पडला संसार 'कवितेच्या ओळी वापरून आज पुन्हा एकदा आपली बैलजोडी पंचक्रोशीत चर्चेला आणली. बोराडे हे प्रगतिशील शेतकरी असून राष्ट्रवादी काँग्रेस चे देवळाली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आहेत.

दरवर्षी बैल पोळ्या निमित्त त्यांच्या घरच्या बैलजोडीची ते स्वतः सजावट करतात. गेल्या काही वर्षांपासून राजकीय, सामाजिक आणि त्यावेळी हायपर असलेल्या विषयांना धरून ते बैलांवर फलक लावत सजवतात. गत वर्षी देखील शरद पवारांना इडी ची नोटीस आल्यानंतर त्यांनी सजावटीत वापरलेला 'ईडी पिडा टळू दे, बळीचे ( पवार साहेबांचे) राज्य येऊ दे' या आशयाचा फलक गाजला होता.

यंदा सर्वत्र कोरोनामुळे अडचणी वाढल्या आहेत .त्यातून शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे .तब्बल चार ते पाच महिने सर्व भाजीपाला, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता पुन्हा कदाचित अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे .त्याच अनुषंगाने त्यांनी यंदा हा संदर्भ घेत आणि त्याला तात्या साहेबांच्या उपरोक्त कवितेची जोड देत 'कोरोनामुळे --मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा'--मग बघा ताकद माझ्या बळीराजाची' असे फलक लावत बैलजोडी सजवल्या. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी च्या हटके आणि आगळ्या वेगळ्या सजावटीची आणि प्रासंगिक कल्पकतेची पंचक्रोशीत  मोठी चर्चा होती.

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com