'ऑन ड्युटी' ग्रामविकास अधिकाऱ्यास धक्काबुक्की; ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

अजित देसाई 
Thursday, 1 October 2020

जिल्हा परिषद निधीतून गेल्यावर्षी चापडगाव येथील स्मशानभूमीचे बांधकाम आव्हाड यांनी केले आहे. सदर बांधकाम पूर्ण झाल्याची ताबापावती पुढे करत आव्हाड यांनी बुरसे यांना त्यावर सही मागितली

नाशिक/सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथील स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण झाल्याची ताबा पावती बनवून देण्याची मागणी करत ठेकेदाराने ग्रामविकास अधिकाऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवारी (दि. 30) दापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडला. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संबंधित ठेकेदाराविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रवीण अशोक बुरसे (37) रा. नायगाव रोड , सिन्नर हे चापडगाव व दापुर ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ते कर्तव्यावर हजर असताना दत्ताराम निवृत्ती आव्हाड (27) रा. चापडगाव हे कार्यालयात आले. जिल्हा परिषद निधीतून गेल्यावर्षी चापडगाव येथील स्मशानभूमीचे बांधकाम आव्हाड यांनी केले आहे. सदर बांधकाम पूर्ण झाल्याची ताबापावती पुढे करत आव्हाड यांनी बुरसे यांना त्यावर सही मागितली. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती आहे. प्रशासकांना संबंधित कामाचे अंदाजपत्रक, मूल्यांकन पत्र, काम पूर्णत्वाचा दाखला दाखवल्या शिवाय ताबा पावती देता येणार नाही असे बुरसे यांनी सांगितले. व वरील कागदपत्रांची मागणी केली.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

गुन्हा दाखल

याचा राग येऊन आव्हाड यांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांच्या अंगावर धावून जात शर्टची कॉलर पकडत धक्काबुक्की केली. पाहून घेतो असा दम देत आव्हाड ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडले. यानंतर घडल्या प्रकाराची पंचायत समितीत वरिष्ठांना माहिती देत बुरसे यांनी वावी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ केली म्हणून फिर्याद दिली.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating of village development officer case Filed nashik marathi news