esakal | लॉकडाऊनमध्ये 'त्यांना' मिळाला सोशल मीडियाचा आधार...थेट बांधावरच कलिंगड विक्री!
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon.jpg

फळे काढणीला आली असतानाच लॉकडाउन सुरू झाला. व्यापाऱ्यांशी संपर्क केला असता ते चार ते पाच रुपये प्रतिकिलोने मागू लागले. दिले तर तोटा होईल आणि विकले नाही तर शेतातच खराब होणार अशा द्विधेत ते असतानाच त्यांच्या मदतीला सोशल मीडियाची पोस्ट देवदूतासारखी आली अन्...

लॉकडाऊनमध्ये 'त्यांना' मिळाला सोशल मीडियाचा आधार...थेट बांधावरच कलिंगड विक्री!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (निमोण) एकरी 55 हजार रुपये खर्च करून दरेगाव येथील प्रयोगशील शेतकरी भाऊसाहेब देवरे यांनी कलिंगड शेती फुलविली. फळे काढणीला आली असतानाच लॉकडाउन सुरू झाला. व्यापाऱ्यांशी संपर्क केला असता ते चार ते पाच रुपये प्रतिकिलोने मागू लागले. दिले तर तोटा होईल आणि विकले नाही तर शेतातच खराब होणार अशा द्विधेत ते असतानाच त्यांच्या मदतीला सोशल मीडियाची पोस्ट देवदूतासारखी आली अन्...

शेतातच ग्राहक येऊन कलिंगड खरेदी

चांदवड तालुक्‍यातील पूर्व भागात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असते. अशा परिस्थितीतही श्री. देवरे यांनी कलिंगडाची लागवड करीत 66 लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. लॉकडाउनमुळे विक्रीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी व्हॉट्‌सऍप व फेसबुकवर कलिंगडाचे फोटो, भाव याची माहिती फॉरवर्ड केली. त्यातून जाहिरात करीत त्यांनी 15 टन मालाची शेताच्या बांधावरच 12 रुपये किलोने विक्री करीत तिप्पट भाव मिळविला. त्यामुळे गावातूनच मोठी मागणी झाली. कोणताही वाहतूक खर्च न करता शेतातच ग्राहक येऊन कलिंगड खरेदी करू लागले. उरलेला पाच ते दहा टन माल जवळील बाजारपेठेत विकल्याचे श्री. देवरे यांनी सांगितले. याच प्रकारे दरेगाव येथील राजू देवरे, मधुकर देवरे आणि वराडी येथील अनंता आहेर यांनी कलिंगडची विक्री करीत चांगला नफा मिळविला. 

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा

शहरापेक्षा गावातच आम्हाला चांगल्या दर्जाचे कलिंगड मिळाले. शेतकऱ्यांच्या बांधावर आणि कमी दरात मिळाल्याने ग्राहक समाधानी आहेत. - राजेंद्र देवरे, ग्राहक दरेगाव 

हेही वाचा > चार वर्षांनंतर 'तो' रस्ता चकाकला...पण, श्रेय कुणाचे? राजकारण तापण्याची शक्‍यता