esakal | संतापजनक! एक तर रेडझोन परिसर अन् हॉटस्पॉटसुध्दा...त्यात पिता-पुत्रने केला 'असा' कारनामा
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon 123.jpg

मालेगावात सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मालेगाव परिसर रेड झोन आणि हॉटस्पॉट करण्यात आला आहे. अशातच तिथून ये- जा करणेही किती धोक्याचे ठरू शकते. हे काही लोकांना अजूनही कळत नाही. मालेगावाहून पेठला आलेल्या पिता-पुत्रने असाच काही संतापजनक कारनामा केला आहे.

संतापजनक! एक तर रेडझोन परिसर अन् हॉटस्पॉटसुध्दा...त्यात पिता-पुत्रने केला 'असा' कारनामा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / पेठ : मालेगावात सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मालेगाव परिसर रेड झोन आणि हॉटस्पॉट करण्यात आला आहे. अशातच तिथून ये- जा करणेही किती धोक्याचे ठरू शकते. हे काही लोकांना अजूनही कळत नाही. मालेगावाहून पेठला आलेल्या पिता-पुत्रने असाच काही संतापजनक कारनामा केला आहे.

असा केला कारनामा..

मालेगाव हॉटस्पॉट असताना तेथून व्यवसायानिमित्त बिअर बारमालक कैलास सूर्यवंशी, अमोल कैलास सूर्यवंशी (रा. सटाणा नाका, काबरा कॉम्पलेक्‍स, संगमेश्‍वर भाग-2, मालेगाव) यांनी पेठ शहरात येऊन आपले देशी दारूचे दुकान सुरू केले होते. शासनाने राज्यातील वाइन शॉप व देशी दारू दुकाने सुरू करण्याचा आदेश दिल्यानंतर मोहना गार्डन बिअर बार व देशी दारू दुकानाचे संचालक असलेल्या दोघा पिता-पुत्रांनी पेठ येथील आपले देशी दारू विक्रीचे दुकान उघडले. परंतु पेठ येथील काही नागरिकांनी याबाबत सकाळी तहसील कार्यालय, पोलिस ठाणे व नगरपंचायत कार्यालयात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत काहार यांनी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतर पेठ पोलिसांनी लिपिक कृष्णा गोविंद गाढवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. पेठ शहरात किंवा तालुक्‍यात मालेगावसारख्या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी नगराध्यक्ष मनोज घोंगे यांनी व्यक्त केली आहे.  

हेही वाचा > मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...

बिअर बारमालक पिता-पुत्राविरोधात पेठला गुन्हा 

मालेगाव येथील रहिवासी असलेले बिअर बारमालक पिता-पुत्राविरोधात पेठ येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांकडून पेठ येथील त्यांच्या मालकीचे बिअर बार व देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आले होते. मालेगाव येथील हे पिता-पुत्र पेठला अप-डाऊन करीत असल्याची स्थानिक नागरिकांकडून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. 

हेही वाचा >नियतीचा क्रूर डाव! कामधंदा नाही म्हणून कुटुंबासह निघाला गावी..पण कसारा घाटातच "त्याचा" काळ उभा होता..​

go to top