सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार! भिकारीकडून 'हे' कसलं काम करून घेतलं जातयं?

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

भिकाऱ्याला पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे देण्याच्या आमिषाने हे काम करण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दिवसाढवळ्या संबंधित प्रकार सुरू आहे. ​

नाशिक : जिल्हा रुग्णालयामध्ये रोज निघणाऱ्या मेडिकल कचऱ्याचे विलीगीकरणाची जबाबदारी सफाई कामगारांऐवजी एका भिकाऱ्याचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः ज्या सफाई कामगारांची ही जबाबदारी आहे त्यांनीच या भिकाऱ्याला पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे देण्याच्या आमिषाने हे काम करण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दिवसाढवळ्या संबंधित प्रकार सुरू आहे. 

सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार, सफाई कामगारांची अजब शक्कल 

जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या उपचारासाठी सलाईनसह अनेक साहित्यांचा वापर केला जातो. वापरण्यात आलेले साहित्य अर्थात मेडिकल कचरा एकत्रितरित्या सफाई विभागाच्या विलीगीकरण कक्षाकडे पाठविला जातो. या मेडिकल कचऱ्याचे विलीगीकरण करण्यासाठी दोन सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कचऱ्यात अनेक प्रकारचे घातक असे साहित्य वापरण्यात आलेले असते. त्यानुसार यातील कचरा विलीगीकरण करणे आवश्‍यक असते. 

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

घातक कचऱ्याचे विलीगीकरण करण्यासाठी परस्पर नेमले

मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेडिकल कचऱ्याचे विलीगीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्येच राहत असलेल्या भिकाऱ्यालाच या घातक कचऱ्याचे विलीगीकरण करण्यासाठी परस्पर नेमले आहे. त्यासाठी त्याला कर्मचाऱ्यांनी खाण्या-पिण्यासाठी पैशांचे आमिष दाखविले आहे. त्यामुळे हा भिकारी रुग्णालयातून आलेल्या मेडिकल कचऱ्याचे विलीगीकरण करतो. तो कचरा वाहून नेतो. मात्र हे करीत असताना त्याच्याकडे कोणत्याही आरोग्याच्या दृष्टिकोनातून साहित्य नसल्याने त्याच्या जीविताला धोका उत्पन्न होण्याची शक्‍यता आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर ही जबाबदारी होती ते मात्र काम न करता मोकळे फिरत असताना रुग्णालय प्रशासनाच्याही ही बाब नजरेत आलेली नाही, याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे.  

हेही वाचा > PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: begger,s use for medical waste disposal Nashik Marathi News