
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरण्याबरोबरच अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र अद्यापही विविध ९१० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेत डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अशी एकूण ७६१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पदे भरण्यासाठी मुलाखतप्रक्रिया सुरू
शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना, कोरोना नियंत्रणासाठी वैद्यकीय विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. वास्तविक चार, पाच वर्षांपासूनच पदे रिक्त होते. मात्र आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले. कोरोनामुळे आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणात अपुरी पडत आहे. वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कामात अडचणी येत आहेत. शासनाच्या पोर्टलवरून आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कर्मचारी मागवले जात असले तरी ते रूजू होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मानधनावर ७६१ पदे भरली जाणार आहेत. यातील अडीचशे पदे स्टाफ परिचारिकांची आहेत. बीएएमएस पदवीधरांसाठी १०० जागा आहेत. मल्टिस्किल हेल्थ वर्करची १०० पदे भरली जाणार आहेत. ५० वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदे भरण्यासाठी मुलाखतप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेत भरली जाणारी पदे
फिजिशिएन- दहा, भूलतज्ज्ञ- दहा, वैद्यकीय अधिकारी- ५०, वैद्यकीय अधिकारी (आयुष)- १००, स्टाफ नर्स- २५०, मिश्रक- ६५, समुपदेशक- ३०, एएनएम- १५०, मल्टिस्किल हेल्थ वर्कर- १००.
जिल्हा परिषदेत तब्बल ९१० पदे रिक्त
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदे (कंसात मंजूर पदे)
- आरोग्यसेविका - ५३० (१,०६९)
- आरोग्य सहाय्यिका - ६० (१२३)
- आरोग्यसेवक (पुरुष) - २५७ (५६९)
- आरोग्य सहाय्यक (पुरुष) - १५ (१४८)
- औषध निर्माण अधिकारी - १७ (११४)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञान - १६ (७२)
- आरोग्य पर्यवेक्षक - १५ (१९)
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.