esakal | सोने खरेदीत आकर्षक लाभांच्या योजनेत पैसे गुंतवत असाल...तर ही बातमी तुमच्यासाठी
sakal

बोलून बातमी शोधा

gold jwellery scheme.jpg

सोन्यातील गुंतवणूक ही महत्त्वाची गुंतवणूक मानली जाते. कमीत कमी पैशात व सोयीनुसार कधीही लहान लहान प्रमाणात गुंतवणूक करीत, त्या गुंतवणुकीचा विवाहापासून तर घर खरेदीसारख्या मोठ्या गुंतवणुकीवेळी उपयोग होतो. त्यामुळे अनादी काळापासून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अलीकडे सोन्याच्या आर्थिक गुंतवणुकीतील महत्त्व लक्षात घेऊन अनेक ठिकाणी, तर काही ठिकाणी सराफ पेढ्यांनी जास्त लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, अशा योजनांना केंद्र शासनाची मान्यता नाही.

सोने खरेदीत आकर्षक लाभांच्या योजनेत पैसे गुंतवत असाल...तर ही बातमी तुमच्यासाठी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोने विक्रीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे पुढे येऊ लागल्याने सराफ असोसिएशनने सोने खरेदीत आकर्षक लाभांच्या योजनांबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काही दोन-चार पेढ्यांमुळे सरसकट सगळ्या सुवर्ण बाजारावर परिणाम होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन सराफ असोसिएशनने प्रबोधन सुरू केले आहे. 

जादा लाभाच्या योजनांपासून सावध राहा 

सोन्यातील गुंतवणूक ही महत्त्वाची गुंतवणूक मानली जाते. कमीत कमी पैशात व सोयीनुसार कधीही लहान लहान प्रमाणात गुंतवणूक करीत, त्या गुंतवणुकीचा विवाहापासून तर घर खरेदीसारख्या मोठ्या गुंतवणुकीवेळी उपयोग होतो. त्यामुळे अनादी काळापासून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अलीकडे सोन्याच्या आर्थिक गुंतवणुकीतील महत्त्व लक्षात घेऊन अनेक ठिकाणी, तर काही ठिकाणी सराफ पेढ्यांनी जास्त लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, अशा योजनांना केंद्र शासनाची मान्यता नाही. तसेच ग्राहक फसल्याची काही उदाहरणे पुढे आल्याने एकूणच सराफी व्यवसाय आणि सोने बाजार यावरील लहान लहान गुंतवणुकीचा विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी जादा लाभांच्या योजनात न फसण्याचे आवाहन केले आहे. 

फसवणुकीच्या 978 घटना 
देशात पाच वर्षांत 978 फसवणुकीच्या प्रकरणातील झालेल्या फसवणुकीचा आकडा 80 हजार कोटींहून अधिक असल्याने देशात अनियमित जमा योजना, सुवर्ण संचय योजना असुरक्षित गुंतवणूक यावर भारत सरकारने नियंत्रणासाठी पोंजी स्कीम ऍक्‍ट-2019 कायद्याने प्रतिबंध केला आहे. अवाजवी व्याज अथवा दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या योजनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. कायद्यानुसार खालीलप्रमाणे योजना करता येत नाही. तसेच मल्टी लेव्हल मार्केटिंग, वार्षिक 12.5 पेक्षा जास्त व्याजाच्या गैरबॅंकिंग वित्तीय संस्थांच्या योजना, उंच व्याजाचे आमिष दाखवून घेतलेले खासगी कर्ज, सुवर्ण संचय योजना, भिशी योजना तसेच लकी ड्रॉ अशा 
सोडतींना पोंजी स्कीम ऍक्‍ट 2019 या कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. 

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

सुरक्षित सोने खरेदीबाबत सराफ असोसिशनतर्फे प्रबोधन 
जिल्ह्यातील कुठलाही सराफ व सुवर्णकार सुवर्ण संचय योजना राबवत नाही. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्याचे सराफ असोसिएशने स्वागत करीत अशा योजना राबवत असलेल्या व्यावसायिकांना तेव्हाच, अशा योजना त्वरित बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ग्राहकांनीही अशा अवाजवी सूट, बक्षिसाच्या योजनांच्या आमिषाला बळी न पडता पारंपरिक सराफ व्यावसायिकांकडे गुंतवणूक करावी. - चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक 

हेही वाचा > 'सर, याच्याकडे बंदूक आहे!'...अन् शाळेत उडाली खळबळ...

go to top