Bharat Bandh Updates :..अन्यथा या परिस्थितीस केंद्र सरकार जबाबदार राहील - आमदार बनकर

माणिक देसाई
Tuesday, 8 December 2020

कृषी कायदा संमत करतांना कुठल्याही शेतकरी संघटनेला विचारात न घेता फक्त पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदा संमत करून तो लादण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा विरोध म्हणून शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेला हा निफाड तालुका मागे हटणार नाही

निफाड (जि.नाशिक) : कुठलीही चर्चा न करता, जाचक अटी असलेले आणि फक्त आणि फक्त पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्रात मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा विरोध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्या वतीने आज निफाड तालुका बंद ठेऊन निफाड येथे कृ.उ.बा. उपबाजार आवार ते तहसील कार्यालयापर्यंत आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढत तहसिलदार यांना निवेदन देऊन कृषी विधेयकाचा निषेध करण्यात आला.

भारत बंद" ला पाठिंबा देत निफाड तालुक्यात कडकडीत बंद  

कृषी कायदा संमत करतांना कुठल्याही शेतकरी संघटनेला विचारात न घेता फक्त पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदा संमत करून तो लादण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा विरोध म्हणून शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेला हा निफाड तालुका मागे हटणार नाही आणि या सर्व उद्भवणाऱ्या परिस्थितीस केंद्र सरकार जबाबदार राहील असे प्रतिपादन आमदार बनकर यांनी केले.  यावेळी मधुकर शेलार आणि शेतकरी नेते राजेंद्र डोखळे यांनी आक्रमक भावना व्यक्त केल्या  प्रसंगी उपबाजार आवार निफाड येथे मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते व शेतकरी जमले होते, तहसील कार्यालयावर मोर्चा पोहचला असता केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता, तहसिलदार निफाड यांना निवेदन दिले

हेही वाचा- अखेर बेपत्ता शेतमजूराचा शोध लागला; पण धक्कादायक दृश्याने गावात खळबळ

प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, महिला प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, सुभाष कराड, जिल्हा उपाध्यक्ष इरफान सैय्यद, जि. प. सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, युवक अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, विधानसभा अध्यक्ष भूषण शिंदे, शहराध्यक्ष तनवीर राजे, सुरेश खोडे, शिवाजी ढेपले, माधवराव ढोमसे, निवृत्ती धनवटे, विलास बोरस्ते, विजय कारे, बाबासाहेब शिंदे, नाना पाटील भंडारे, धनंजय भंडारे, दत्तू मुरकुटे, नितीन कापसे, रावसाहेब गोळे, नारायण पोटे, जयराम मोरे, संजय सांगळे, बापूसाहेब कुंदे, कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat bandh at nifad nashik marathi news