'महिंद्र ॲन्ड महिंद्र'ची मदार आता नाशिकवर!...कसे ते वाचा 

BL12_MAHINDRA_1078074f.jpg
BL12_MAHINDRA_1078074f.jpg

नाशिक : (सातपूर) औरंगाबादमधील एका कंपनीतील रुग्णसंख्या वाढल्याने वाळुंज, शेंद्रासह इतर औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाउनची वेळ आली. पुण्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहन उत्पादनात मोठे नाव असलेल्या या उद्योगाची मदार आता नाशिकवर असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या भेटीने स्पष्ट झाले आहे. कोण आहेत ते एकदा वाचाच... 

अवलंबित वेन्डर्सना फायदा

सरकारकडून अटी शिथिल केल्या जात असताना देशात सर्वात अगोदर औद्योगिक चाके गतिमान व्हावीत, यासाठी नाशिककरांनी प्रयत्न केला आहे. त्यानंतर इतर शहरांतील चाके सुरू झाली. मात्र, इतर शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. कोरोना विषाणूचा इतर राज्यांबरोबरच मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महिंद्र ऍन्ड महिंद्राची नाशिकवर विशेष मदार राहील. महिंद्रतर्फे आगामी काळात उत्पादनवाढीच्या दिशेने पावले टाकण्याचे संकेत आहेत.

अनेकांच्या हाताला काम मिळणार

महिंद्रचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी नाशिकसह इगतपुरीच्या प्रकल्पाला भेट दिली. त्यासंबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्‌विटद्वारे दिली. श्री. गोयंका यांच्या प्रकल्प भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नाशिकच्या प्रकल्पामध्ये आणखी लाइन सुरू करण्यासंबंधीचा निर्णय अंतिम होत आहे. तसे झाल्यास महिंद्रवर अवलंबून असलेल्या वेन्डर्सना फायदा होणार आहे. घरी बसलेल्या अनेक कामगारांच्या हाताला यामुळे काम मिळणार आहे. 

आरोग्य अन्‌ सुरक्षेची काळजी 

श्री. गोयंका यांनी ट्‌विटमध्ये इगतपुरी आणि नाशिक प्रकल्पाला भेट दिल्याचे नमूद करतानाच आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचाही आवर्जून उल्लेख केला. धातूंचा नाद आणि रोबोटिक यंत्रांचा आवाज ऐकायला मिळाला, हा क्षण आनंददायी होता, असेही त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

औद्योगिक चाके रुळावरचा आनंद 

नाशिकची औद्योगिक चाके रुळावर आल्याबद्दलचा आनंदभाव श्री. गोयंका यांचा आहे. तसेच, पाच महिन्यांच्या कालखंडानंतर लाइन्स सुरू झाल्याचे पाहून अभिमान वाटला, असे म्हणत त्यांनी दोन्ही प्रकल्पांतील टीमचे आभार मानले. महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनीही नाशिकमधील औद्योगिक चाके रुळावर आल्याबद्दल समाधान व्यक्त करणारे ट्‌विट केले आहे. तसेच, देशातील औद्योगिक चाके पुन्हा सुरळीतपणे धावू लागल्याचे समाधान असल्याचे श्री. महिंद्र यांनी म्हटले आहे. 

असे आहेत ट्‌वीट 

तब्बल पाच महिन्यांनंतर धातूंचा नाद आणि रोबोटिक यंत्रांचा आवाज ऐकायला मिळाला. हा क्षण आनंददायी होता. विशेषत: आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेतली जातेय, ही बाब अधिक महत्त्वाची आहे. - पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्र ऍन्ड महिंद्र 

चाके पुन्हा वेगाने 

आपण समूहाच्या प्रकल्पांना भेटी देऊन उत्पादनाचा आढावा घेत आहात, हे पाहून आनंद वाटला. त्यापेक्षा जास्त आनंद देशातील औद्योगिक चाके पुन्हा वेगाने आणि सुरक्षितपणे फिरू लागल्यामुळे झाला आहे. - आनंद महिंद्र, अध्यक्ष, महिंद्र समूह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com