कोरोनाबाधितांच्या घरांतून चक्क १४१ टन बायोमेडिकल कचरा! इतिहासात प्रथमच सर्वाधिक वेस्ट 

corona garbage 1.jpg
corona garbage 1.jpg

नाशिक : कोरोनासंसर्गामुळे महापालिकेसह खासगी रुग्णालये फुल झाल्यानंतर कमी जोखमीच्या रुग्णांना घरातच उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे घरांमधून घन कचऱ्याबरोबरच प्रथमच बायोमेडिकल वेस्ट येण्याच्या प्रमाणात वाढ झाली. सात महिन्यांत तब्बल १४१ टन बायोमेडिकल वेस्ट बाहेर पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडला आहे. 

कोरोनाबाधितांच्या घरांतून १४१ टन बायोमेडिकल कचरा 
एप्रिलमध्ये पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. मेअखेरपर्यंत शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, मागच्या महिन्याचे विक्रम मोडीत निघाले. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये हजारांच्या पटीने रुग्णांची नोंद झाली. एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असला, तरी महापालिकेने मार्चपासूनच रुग्णसज्जता करताना तपासण्या सुरू केल्या होत्या. एप्रिलमध्ये कोरोनाबाधित आढळल्यानंतर बाधिताच्या घरापासून तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर जशी रुग्णसंख्या वाढत गेली, त्याप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्राचे नियमही बदलत गेले. इमारत व त्यानंतर एका खोलीपुरते प्रतिबंधित क्षेत्र झाले.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक वेस्ट 

विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील म्हणजेच होम क्वारंटाइन व्यक्तीच्या घरातून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे बायोमेडिकल वेस्ट संकलित केले जाते. त्यानुसार मार्चअखेरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत १४१.२४९ टन बायोमेडिकल कचरा जमा करण्यात आले. पीपीई किट, गोळ्या व औषधांचे रॅपर आदींचा समावेश या वस्तूंमध्ये आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या पन्नास हजारी पार केली. दोन हजार ७६ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. सध्या तीन हजारांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

महिन्याकाठी बायोमेडिकल कचरा 
महिना किलो टन 

मार्च ३५ ०.०३५ 
एप्रिल २,८९९ २.८९९ 
मे २,४२५ २.४२५ 
जून ६,९६० ६.९६ 
जुलै २१,३५० २१.३५ 
ऑगस्ट ५५,७६५ ५५.७६५ 
सप्टेंबर ५१,८४५ ५१.८४५ 
---------------------------------------------------------- 
एकूण १,४१,२७९ १४१.२४९  

संपादन - ज्योती देवरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com