लॉकडाऊन...भररस्त्यात तर्रर.. महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या वाढदिवसाला धांगडधिंगा..

nashik bike.jpg
nashik bike.jpg

नाशिक रोड : वाढदिवसानिमित्त त्या भागातील काही युवकांनी रात्री दुचाकी फेरी काढली. मद्य पिऊन तर्रर असलेल्या या युवकांनी बराच वेळ येथे धिंगाणा घातला. मुलाचा वाढदिवस जोरात झाला पाहिजे म्हणून याच महाशयांनी पुढाकार घेतला होता. पण यापुढे मात्र...

काय घडले नेमके?

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगरच्या संजय गांधीनगर येथील संस्कृती अपार्टमेंटमध्ये रविवारी (ता.24) रात्री भररस्त्यात वाढदिवस साजरा करून युवकांनी धांगडधिंगा घातला. नीरज तेजाळे याच्या वाढदिवसानिमित्त त्या भागातील काही युवकांनी रात्री दुचाकी फेरी काढली. मद्य पिऊन तर्रर असलेल्या या युवकांनी बराच वेळ येथे धिंगाणा घातला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना कुणीतरी माहिती दिल्यावर पोलिस आले. पोलिस आल्यावर अनेक जण तेथेच दुचाकी सोडून गेले. अनेक जण अंधारात घरांच्या गच्च्यांवर लपले. 

काही तर्रर मंडळींना अंधारात शोधले.
उपनगर पोलिस बऱ्याच दिवसांनंतर गंभीरपणे कारवाया करताना दिसले. एवढ्या रात्री पोलिसांनी दुचाकी पोलिस ठाण्यात उचलून आणल्या. काही तर्रर मंडळींना अंधारात शोधले. सैरावैरा पळणाऱ्या अनेकांनी मिळेल त्या घरांचा व गच्चीचा आसरा घेतलेल्या संशयितांना लॉकडाउनच्या काळात गर्दीचे उल्लंघन करीत रस्त्यावर धांगडधिंगा घालणाऱ्याना शोधून काढले. याप्रकरणी योगेश तेजाळे (वय 45), नीरज तेजाळे (20), अनिकेत जाधव, अर्चिस देवकर यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

 महापालिका आयुक्त कारवाई करणार? 
संशयित योगेश तेजाळे महापालिकेत आरोग्य कर्मचारी आहे. मुलाचा वाढदिवस जोरात झाला पाहिजे म्हणून याच महाशयांनी पुढाकार घेतला होता. मुलांसोबत रात्रीच्या गाड्या फिरवत आणि जोरजोरात हॉर्न वाजवत युवकांचा जीव धोक्‍यात घालून योगेश तेजाळे यांनी स्वतःच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लॉकडाउन, जमावबंदीसह रस्त्यावर गैरकायदा मंडळी जमवत सगळे नियम धाब्यावर बसविले. त्यामुळे आता महापालिका आयुक्त या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार, हा प्रश्‍न आहे. 
हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com