भाजपच्या हातून स्थायीची सत्ता जाणार? उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी 

विक्रांत मते
Monday, 11 January 2021

तौलनिक संख्या बळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे. विरोधात निर्णय झाल्यास महापालिकेतील स्थायी समितीची सत्ता भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे. 

नाशिक : तौलनिक संख्या बळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे. विरोधात निर्णय झाल्यास महापालिकेतील स्थायी समितीची सत्ता भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे. 

काय आहे नेमके प्रकरण

महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी नाशिक रोडच्या पोट निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव व फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे संख्याबळ घटल्याने भाजपचे तौलनिक संख्याबळ घटले आहे. तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपच्या ८ ऐवजी ९ सदस्यांची नियुक्ती केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. महापौरांनी ९ सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या दरम्यान स्थायी समितीवर भाजपने बहुमताच्या आधारे सत्ता मिळविली होती. फेब्रुवारीत स्थायी समितीच्या ८ निवृत्त जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यापूर्वी १३ जानेवारीला शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयात महाराष्ट्र शासन, विभागीय महसुल आयुक्त, महापालिका आयुक्त, नगरसचिव यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

स्थायीच्या निवडणुकीवर परिणाम 

भाजपचे तौलनिक संख्याबळ घटल्याने त्यानुसार स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचे न्यायालयाने आदेशित केल्यास स्थायी समितीमध्ये १६ पैकी ८ सदस्य भाजपचे होतील. शिवसेनेचे ५ तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचा प्रत्येकी १ सदस्य होईल. अशावेळी सर्व विरोधी पक्ष शिवसेनेच्या बाजूने उभे राहिल्यास आठ-आठ सदस्य होईल. चिठ्ठी पध्दतीने सभापतीची निवड केल्यास त्यातून विरोधी पक्षाची चिठ्ठी निघाल्यास भाजपच्या हातून स्थायी समितीची सत्ता जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is likely to lose the power of the standing committee in the municipal corporation nashik marathi news