चार विषय समित्यांवर भाजपचेच वर्चस्व! ऑनलाइन महासभेत प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती 

विक्रांत मते
Wednesday, 21 October 2020

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या चार विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती मंगळवारी (ता. २०) ऑनलाइन महासभेत जाहीर करण्यात आली. भाजपचे सर्वाधिक ६५ नगरसेवक असल्याने प्रत्येक समितीवर भाजपचे पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे विषय समित्यांवर सभापतिपदावर भाजपच्याच नगरसेवकांना संधी मिळणार आहे. 

नाशिक : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या चार विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती मंगळवारी (ता. २०) ऑनलाइन महासभेत जाहीर करण्यात आली. भाजपचे सर्वाधिक ६५ नगरसेवक असल्याने प्रत्येक समितीवर भाजपचे पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे विषय समित्यांवर सभापतिपदावर भाजपच्याच नगरसेवकांना संधी मिळणार आहे. 

चार विषय समित्यांवर भाजपचेच वर्चस्व

महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे गटनेत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. मार्चमध्ये समित्यांची मुदत संपुष्टात आली होती. निवडणुकांवर राज्य शासनाने बंदी आणल्याने तब्बल सात महिन्यांनंतर विषय समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. महिला व बालकल्याण, शहर सुधार समिती, वैद्यकीय व आरोग्य, विधी समिती या चार समित्या अस्तित्वात आहेत. एका समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाते. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने संख्याबळानुसार प्रत्येक समितीवर भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

ऑनलाइन महासभेत प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती

३६ सदस्यांची चारही समितीवर नियुक्ती करण्यात आली. पुढील पाच महिन्यांसाठी नियुक्ती असेल. त्यानंतर पुढील वर्षी नवीन सदस्यांची नियुक्ती होईल. सदस्यांपैकी भाजपचे वीस, शिवसेनेचे बारा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मिळून चार सदस्य नियुक्त करण्यात आले. नाशिक रोड प्रभाग समितीत मीरा हांडगे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेथे शिवसेनेने बाजी मारल्याने सभापतिपद हुकलेल्या हांडगे यांना महिला व बालकल्याण समितीवर संधी देण्यात आली. नाशिक रोड विभागात राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक जगदीश पवार यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधी समितीवर नियुक्त करण्यात आले. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

विषय समित्यांवरील नवीन सदस्य 
महिला बालकल्याण- मीरा हांडगे, हिमगौरी आहेर-आडके, प्रतिभा पवार, सुप्रिया खोडे, माधुरी बोलकर (भाजप), पूनम मोगरे, राधा बेंडकोळी, रंजना बोराडे (शिवसेना), समीना मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस). 

शहर सुधारणा समिती 
छाया देवांग, अंबादास पगारे, अर्चना थोरात, वर्षा भालेराव, अलका अहिरे (भाजप), सुनील गोडसे, सुदाम डेमसे, सीमा निगळ (शिवसेना), शोभा साबळे (राष्ट्रवादी काँग्रेस). 

वैद्यकीय व आरोग्य समिती 
पुष्पा आव्हाड, सुमन भालेराव, नीलेश ठाकरे, हेमलता कांडेकर, भगवान दोंदे (भाजप), सूर्यकांत लवटे, हर्षदा गायकर, नयना गांगुर्डे (शिवसेना), जगदीश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस). 

विधी समिती 
कोमल मेहेरोलिया, हिमगौरी आडके-आहेर, प्रियांका माने, इंदूबाई नागरे, भाग्यश्री ढोमसे (भाजप), सुधाकर बडगुजर, ॲड. श्‍यामला दीक्षित (शिवसेना), जगदीश पवार व राजेंद्र महाले (राष्ट्रवादी काँग्रेस).  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP monopoly on four subject committees nashik marathi news