भाजपची गांधीगिरी! "दुधाचा काढा प्या..निरोगी व्हा" दूध दरवाढीसाठी अनोखे आंदोलन

संतोष विंचू
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध दरवाढ करून अनुदान देण्याच्या मागणीसाठी गरिबांना मोफत दूध वाटप करत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.  दुधाचा काढा करून केले मोफत वाटप करण्यात आलेल्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.

नाशिक / येवला : भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध दरवाढ करून अनुदान देण्याच्या मागणीसाठी गरिबांना मोफत दूध वाटप करत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.  दुधाचा काढा करून केले मोफत वाटप करण्यात आलेल्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.

भाजपतर्फे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन
आज (ता.१) भारतीय जनता पार्टीच्या वतीने झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करीत आंदोलन करण्यात आले.दुधाला प्रती १० रुपये अनुदान व ३० रुपये भाव दिला पाहिजे यासाठी शांततेत आंदोलन करण्यात आले. येवल्यातील सावरगाव, तांदुळवाडी, ममदापूर, पिंपळगाव लेप, निमगाव मढ, मुखेड,अंदरसुल येथे हे आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी महाविकास आघाडीचा शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करण्यात आला.यावेळी तांदुळवाडी फाटा येथे राज्य सरकारचा निषेध करून ट्रक चालकांना दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

दुध उत्पादक मेटाकुटीला

राजापूर,ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुध उत्पादक शेतकरी आहेत.सध्याच्या परिस्थितीत दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे अशा संकटकाळी जर दुध उत्पादक जगवायचा असेल तर अनुदान थेट दुध उत्पादकांना द्यावे,दुध भुकटीच्या निर्यातीला पन्नास रुपये प्रति किलो अनुदान द्यावे या मागणीसाठी गरीबांना दुध वाटप आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे वाड्या-वस्त्यावर जाऊन दूध वाटप करण्यात आले.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता सानप,गणेश गायकवाड,विजय वैद्य,शिवाजी वनसे, सुकदेव वनसे,बापुसाहेब देवकर,दिपक सपकाळ,सचिन वनसे,केदारनाथ देवकर,अजय वनसे,नाना अहिरे,बबन पवार, बाळासाहेब सपकाळ,प्रमोद वनसे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

रिपोर्ट - संतोष विंचू 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP,s different agitation for milk rates in yeola nashik marathi news