esakal | पोलीसांना मिळाली गुप्त माहिती...अन् दलालांच्या प्लॅनचा झाला 'असा' खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

malrgav kalabajar 1.jpg

मुंबई - आग्रा महामार्गावरील टेहरे-कौळाणे रस्त्यावरील पत्र्याच्या शेडजवळ अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. अन् झाला धक्कादायक खुलासा. रविवारी (ता.28) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

पोलीसांना मिळाली गुप्त माहिती...अन् दलालांच्या प्लॅनचा झाला 'असा' खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील टेहरे-कौळाणे रस्त्यावरील पत्र्याच्या शेडजवळ अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. अन् झाला धक्कादायक खुलासा... रविवारी (ता.28) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

अन् झाला धक्कादायक खुलासा...

शहरातील स्वस्त धान्य दुकानदार धान्याची साठवणूक करून काळ्या बाजारात विक्री व वाहतूक करत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. मुंबई - आग्रा महामार्गावरील टेहरे-कौळाणे रस्त्यावरील पत्र्याच्या शेडजवळ अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकून स्वस्त धान्य काळाबाजार व खरेदी-विक्री करणाऱ्या सात जणांना अटक केली. चौघे संशयित फरार आहेत. या कारवाईत पथकाने 2 लाख 22 हजार 400 रुपये किमतीचा 139 गोणी तांदूळ, सहा लाख रुपये किंमतीच्या दोन पिकअप, 17 हजार 500 रुपये किंमतीचे सहा मोबाईल यासह आठ लाख 39 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (ता.28) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सात संशयितांना अटक

या वेळी नरेंद्र शेवाळे यांच्या पञ्याच्या शेडजवळ मोहम्मद गुरफान अब्दुल सुभान (65, रा. रजापुरा), शीतल लोहाडे (45, रा. सावता नगर), अब्दुल इसाक सत्तार (32, रा. महेवी नगर), शेख बुरहान शेख बुढण (50, रा. गवळीवाडा), शेख ईसार इसाक (30, रा. देवीचा मळा), फारुख रमजान खान (35, हुडको कॉलनी), सय्यद जाफर सलीम (25, रा. इंदिरानगर, गवळीवाडा) हे स्वस्त धान्याची खरेदी-विक्री व काळाबाजार करताना मिळून आले. या सात संशयितांना पोलिसांनी अटक केली. यातील गुफरान व इसाक हे दलाल आहेत. बुरहान वाहनाचा मालक तर ईसार व फारुक वाहनचालक तर शीतल खरेदीदार असून जाफर हा हमाल आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

तीन दिवस पोलीस कोठडी

स्वस्त धान्य विक्री करणारा दुकानमालक (क्रमांक 21/2) निसार शेख (रा. बजरंग वाडी), धान्य विक्रेता जाफर शेख (रा. आयेशानगर), शेड मालक नरेंद्र शेवाळे (रा. टेहेरे) व पिकअप मालक कंदन केदार (रा. कॅम्प) हे चौघे संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. किल्ला पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तुंचा काळाबाजार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या चौघांना सोमवारी (ता.29) पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवस (1 जुलै) पोलीस कोठडी सुनावली आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

पथकाची कारवाई

पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, पोलिस शिपाई तुषार गरुड, तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, पुरवठा निरीक्षक रणजित रामाघरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.