esakal | ''राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही'' - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal

नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. याबाबत नाशिकच्या महापौरांनीच आता तक्रार केली आहे. खुद्द महापौरांनी तक्रार केली म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असून तथ्य असल्याशिवाय ते आरोप करणार नाही

''राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही'' - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहेत. त्यामुळे इगतपुरीच काय तर राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाई पासून वाचणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

स्मार्ट सिटीबद्दल काय म्हणाले भुजबळ

नाशिक स्मार्ट सिटीच्या विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले की, नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. याबाबत नाशिकच्या महापौरांनीच आता तक्रार केली आहे. खुद्द महापौरांनी तक्रार केली म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असून तथ्य असल्याशिवाय ते आरोप करणार नाही. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालू असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा > काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

फटाके वाजवण्यावर नियंत्रण 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण फटाक्यातून अधिक वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

हेही वाचा > एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

अधिवेशनाबद्दल निर्णय लवकरच

हिवाळी अधिवेशनाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, नागपूर येथील आमदार निवासात कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड चे विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी मागणी आहे. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.