
वणी (जि.नाशिक) : नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाट रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सेल्फी पॉईंटच्या दरीत दुर्गंधी येत असल्याने स्थानिक युवकांनी दरीत डोकावून पाहिले आणि त्याचक्षणी त्यांना धक्काच बसला. नेमके काय घडले?
तीनशे फुट दरीत काय आढळले?
नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाट रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सेल्फी पॉईंटच्या दरीत दुर्गंधी येत असल्याने स्थानिक युवकांनी दरीत डोकावून पाहिले असतात त्यांना असलेला झुडपात तरुणाचा मृतदेह अडकल्याचे दिसले. याबाबतची माहीती कळवण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पोलिस मित्र व स्थानिक तरुणांच्या मदतीने दोरखंड दरीत सोडून दोरखंडाद्वारे दरीत उतरुन मृतदेह काढण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासन व पोलीस मित्रांना जीव धोक्यात घालून मोठी कसरत करावी लागली. तसेच युवकाचे मृतदेह पाच ते सहा दिवसांचा व कुजलेल्या अवस्थेत चेहरा छिन्नविछन्न असल्यामुळे ओळख पटणे पोलीस प्रशाशनाला अवघड जात आहे.
नक्की हत्त्या की आत्महत्या?
नांदुरी - सप्तशृंगी गड घाटात मध्यावर सेल्फी पाईंट येथील सुमारे तीनशे फुट असलेल्या दरीत अज्ञात तरुणाचे मृतदेह आढळून आला आहे.नक्की हत्त्या की आत्महत्या याची चौकशी पोलीस करत आहेत.नक्की हत्त्या की आत्महत्या याची चौकशी पोलीस उपवीभागीय अधीक्षक अमोल गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नांदुरी पोलीस कर्मचारी एस. आय. खाडे, पोलीस नाईक योगेश गवळी, पोलीस कर्मचारी शिवा शिंदे, पोलीस कर्मचारी कोशिरे करत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण देशमुख, पोलीस मित्र चंद्रकांत पांनपाटील तसेच सप्तशृंगी गड ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांनीही मृतदेह काढण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.