धक्कादायक! चक्क अप्पर पोलीस अधीक्षकांचा बॉडीगार्डच निघाला कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 May 2020

जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सातशेच्या पुढे गेली आहे. बुधवारी आलेल्या १२५ अहवालांपैकी बावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १०३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पॉझिटिव्ह रुग्णांत सर्व पोलिस कर्मचारी आहेत. त्यात हिम्मत नगर पोलिस ठाण्याचा एक, जालना येथील सहा आणि नाशिक ग्रामीण पोलिसांतील पंधरा आहेत. त्यात तीन नाशिक रोड येथील असुन त्यांचे भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सातशेच्या वर पोहचली आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये यातील सर्व पोलिस कर्मचारी होते. त्यांनी मालेगाव येथे बंदोबस्त केला असून हे सर्व नाशिक आणि जालना येथील आहेत. अशातच धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये नाशिक जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांचा अंगरक्षक देखील पॉझिटिव्ह आढळल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. यामुळे सर्व पोलीस यंत्रणात खळबळ माजली आहे.

कोरोनाच्या मगरमिठ्ठित अडकताएत पोलीस
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सातशेच्या पुढे गेली आहे. बुधवारी आलेल्या १२५ अहवालांपैकी बावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १०३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पॉझिटिव्ह रुग्णांत सर्व पोलिस कर्मचारी आहेत. त्यात हिम्मत नगर पोलिस ठाण्याचा एक, जालना येथील सहा आणि नाशिक ग्रामीण पोलिसांतील पंधरा आहेत. त्यात तीन नाशिक रोड येथील असुन त्यांचे भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत बारा जणांना आडगाव येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व पोलिस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेले होते. ते सर्व मालेगावशी संबंधित आहेत.  त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मालेगावला बंदोबस्ताला गेलेले तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या तेथे संपर्कात आलेल्या पोलिसांची आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष देऊन तपासणी होत आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बारा आणि सोळा दिवसांची बालके ठरली कोरोना फायटर्स
दरम्यान, कोरोना नावाच्या राक्षसाने, अजगरासारखे सापडेल त्याला गिळंकृत करण्याची मोहीमच हाती घेतली. अशातच येवल्यातील अवघ्या बारा आणि सोळा दिवसांची ही बालके रिअल फायटर्स म्हणून कौतुकास पात्र ठरली आहेत.त्याचे लक्ष्य प्रामुख्याने छोटी मुले आणि वयोवृद्ध. त्याला चीतपट करण्याची ताकद ठेवणारेही अनेक आहेत. मात्र, त्यात विशिष्ट वयोगटाचे प्राबल्य नाही, हेच सिद्ध केलंय इथल्या दोन निरागस बालकांनी!

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bodyguard of the Upper Superintendent of Police is Corona positive nashik marathi news