"तू माझी नाही तर कोणाचीच नाही.." माथेफिरू तिच्यासमोर येऊन बोलला अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

एका मुलीवर तो प्रेम करायचा. त्याने तिच्या आई वडीलांकडे लग्नाची मागणीही घातली. परंतु त्यांनी लग्नासाठी संमती दिली नाही. त्याचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर रागाच्या भरातच तो निघाला. त्यावेळी मुलगी तिच्या आई वडीलांसोबत मजूरीसाठी मळयात गेले होते. तेव्हाच घडला अंगावर काटा आणणारा प्रकार...

नाशिक / ओझर : एका मुलीवर तो प्रेम करायचा. त्याने तिच्या आई वडीलांकडे लग्नाची मागणीही घातली. परंतु त्यांनी लग्नासाठी संमती दिली नाही. त्याचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर रागाच्या भरातच तो निघाला. त्यावेळी मुलगी तिच्या आई वडीलांसोबत मजूरीसाठी मळयात गेले होते. तेव्हाच घडला अंगावर काटा आणणारा प्रकार...

असा घडला प्रकार
संशयित सागर प्रभाकर गायकवाड हा अनेक दिवसांपासून शिलेदार वाडीतील एका मुलीवर प्रेम करायचा. त्याने तिच्या आई वडीलांकडे लग्नाची मागणीही घातली. परंतु त्यांनी लग्नासाठी संमती दिली नाही. त्याचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर रागाच्या भरातच तो निघाला. त्यावेळी मुलगी तिच्या आई वडीलांसोबत मजूरीसाठी यांच्या मळयात गेले होते. सायंकाळी (ता.२६) सहा वाजता कामावरून सुट्टी झाल्याने ती पुढे व आई वडील मागे थोडया अंतराने निघाले. सागर गायकवाडने ती एकटी असल्याचा डाव साधून गंगापूरच्या कालव्यालगत बागेजवळ तिला गाठले  व काही कळायच्या आत धारदार शस्त्राने तिच्या पोटात व पाठीवर वार केले ती खाली पडली असता ती मृत झाली अशी समज झाल्याने तेथून पळ काढून थेट पोलीस ठाणे गाठून त्याने संबंधीत प्रकार कथन केला.व जबानी दिली..

मुलीला गंभीर जखम

दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मुलीच्या आई वडीलांनी जखमी अवस्थेतील मुलीला पाहून आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी मदत करून तिला प्राथमिक उपचारासाठी सायखेडा फाट्यावरील साई हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र जखम मोठी व गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती ओझर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर जखमी मुलीची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

माथेफिरू संशयितावर गुन्हा दाखल

अनेक दिवसांपासून खोल्या वहाळातील एक मुलगा शिलेदार वाडी येथील मुलीवर प्रेम करायचा त्याने तिच्याकडे लग्नासाठी मागणीही घातली परंतू मुलीचे आई  वडील संमती देत नसल्याचा राग मनात धरून काल दि २६ रोजी सायंकाळी ती कामावरून घरी येतांना दिला गाठून तिच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सागर गायकवाड यास अटक करण्यात आली असून पिंपळगांव बसवंत न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. घटनेबाबत ओझर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७ व ५०६नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक ग्रामीणच्या उपविभागिय अधिकारी अरूंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि भगवान मथुरे,पोलीस उपनिरिक्षक अजय कवडे, विजय गायकवाड अंबादास गायकवाड, आहेर खांडवे धारबळे पानसरे पवार दाभाडे होमगार्ड पठाण ह करीत आहेत.

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy attacked on girl due to one sided love nashik marathi news