
सुनंदा फरताळे (वय ६२) यांच्या मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना तपासत मेंदूमृत घोषित केले. वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या फरताळे कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर सामाजिक जाणिवेचा आदर्श ठेवला.
नाशिक : येथील सुनंदा फरताळे (वय ६२) यांच्या मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना तपासत मेंदूमृत घोषित केले. वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या फरताळे कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर सामाजिक जाणिवेचा आदर्श ठेवला. त्यानुसार यकृत नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी नेण्यात आले. तर डोळे व त्वचा दान केल्याने अत्यावस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
अत्यावस्थ रुग्णांना जीवदान
दिवंगत सुनंदा फरताळे या आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या आत्या होत. तर डॉ. दत्तात्रय फरताळे यांच्यासह मुलगी डॉ. सोनिया फरताळे, मुलगा डॉ. वैभव फरताळे व सून डॉ. रचना फरताळे असे कुटुंबातील सदस्य वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहेत. दरम्यान, शनिवारी (ता.९) सुनंदा फरताळे यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉ. मुकेश धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. दरम्यान, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
अवयवदानातून डॉक्टर कुटुंबाचा आदर्श, यकृताचे नाशिकला प्रत्यारोपण
समुपदेशक डॉ. संजय रकिबे व डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्याशी चर्चा व समुपदेशनानंतर सौ. फरताळे यांना हृषीकेश हॉस्पिटल येथे हलविले. येथे समितीने तपासून मेंदूमृत घोषित केल्यानंतर रुग्णाचे शक्य ते सर्व अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यानुसार झेडटीसीसी, पुणे यांना कळविल्यानंतर यकृत नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे गरजू रुग्णास देण्यात आले. डोळे सुशील आय हॉस्पिटलला, तर त्वचा डॉ. नेहेते यांच्या वेदांत त्वचा बँकेत देण्यात आले.
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा