धक्कादायक! लग्नाच्या धामधुमीत वधूच्या बहिणीची आली बातमी.. अन् वऱ्हाडींच्या काळजाचा ठोकाच चुकला!

प्रमोद दंडगव्हाळ 
Thursday, 23 July 2020

नेमके याच महिलेच्या बहिणीचे लग्न गुरुवारी होणार आहे. त्यामुळे महिलेला आता घरी ठेवण्यात आले आहे. तिच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून ऑनलाईन उपचार सुरू आहे.

नाशिक / सिडको : नेमके याच महिलेच्या बहिणीचे लग्न गुरुवारी होणार आहे. त्यामुळे महिलेला आता घरी ठेवण्यात आले आहे. तिच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून ऑनलाईन उपचार सुरू आहे. पण असे काय घडले की संपूर्ण वऱ्ह्याड्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 

चाचणी झाली अन् सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला

भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी खासगी डॉक्टरांच्या मदतीने रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट प्रभागात सुरू केली. त्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांचा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काही जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी (ता. २१) एका महिलेची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली. नेमके याच महिलेच्या बहिणीचे लग्न गुरुवारी होणार आहे. त्यामुळे महिलेला होम क्वारंटाइ करण्यात आले आहे. तिच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून ऑनलाईन उपचार सुरू आहे. वेळीच चाचणी झाल्याने लग्नातील वऱ्हाडी मंडळी कोरोनाबाधित होण्यापासून वाचल्याचे समाधान या मंडळींना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

अन् नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला

सिडकोतील प्रभागांमध्ये नगरसेवकांकडून नागरिकांची कोरोना तपासणीमोहीम हाती घेतली आहे. भीतीपोटी वावरणारी जनता आता हळूहळू घराबाहेर पडून स्वतः तपासणी करू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. रॅपिड ॲन्टिजेन टेस्टद्वारे सुरू असलेल्या तपासणी शिबिरात वधूची बहीणच कोरोनाबाधीत आढळली. वेळीच चाचणी होऊन उपचार सुरू झाल्याने गुरुवारी (ता. २३) होणाऱ्या लग्नसमारंभातील असंख्य वऱ्हाडी पॉझिटिव्ह होण्यापासून वाचले आहेत. लगीनघाई सुरू असलेल्या घरातील नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

ऑनलाइनद्वारे डॉक्टरांकडून उपचार

रॅपिड ॲन्टिजेन टेस्टद्वारे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. ऑनलाइनद्वारे डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या घरातील मंडळी मला भेटले व त्यांनी या शिबिराचे कौतुक केले. लग्नसमारंभातील अनेक मंडळी पॉझिटिव्ह होण्यापासून वाचल्याचे त्यांनी सांगितले. - मुकेश शहाणे, नगरसेवक, भाजप, प्रभाग २ 

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

या अभियानात आरोग्य यात्रा फाउंडेशन आणि श्रीनिवास रुग्णालयाचे डॉ. सतीश चितोडकर यांचे पथक मदत करत आहे. तसेच अंकुश वराडे, प्रवीण सांगळे, पंकज बोरसे, आनंद आडले, सोनू केदार, प्रदीप चव्हाण, किरण वेताळ, वैभव निकुंभ, वाल्मीक मटाले यांचे सहकार्य लाभत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride's sister Corona tested positive in rapid antigen test nashik marathi news