भरदिवसा घडला प्रकार! गाडीची काच फोडून दोन लाख लंपास; बॅंक ग्राहकाला धक्का

अरूण मलाणी
Thursday, 22 October 2020

पाथर्डी फाटा येथील प्रसाद सोनार हे कारमधून कॅनडा कॉर्नरला आले होते. तेथे वाहनतळावर कार उभी करून दुकानात गेले. बँकेत भरणा करण्यासाठी वाहनातील बॅगमध्ये दोन लाख रुपये ठेवलेले होते.

नाशिक : कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्‍लाझा या व्‍यापारी संकुलासारख्या गजबजलेल्‍या ठिकाणाहून भरदिवसा कारमध्ये ठेवलेली दोन लाखांची रोकड लंपास झाल्‍याची घटना बुधवारी (ता. २१) घडली. 

भरदिवसा गाडीची काच फोडून रोकड लंपास 
पाथर्डी फाटा येथील प्रसाद सोनार हे कारमधून कॅनडा कॉर्नरला आले होते. तेथे वाहनतळावर कार उभी करून दुकानात गेले. बँकेत भरणा करण्यासाठी वाहनातील बॅगमध्ये दोन लाख रुपये ठेवलेले होते. काम आवरून ते परतले असता, वाहनाची काच फुटल्‍याचे आढळले. दार उघडून आत तपासले असता, बॅगमधील रोकड चोरीस गेल्‍याचे निदर्शनात आले. त्यांनी सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती कळविली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: broke glass of car and stole cash nashik marathi news