भरदिवसा घडलेला धक्कादायक प्रकार; शेतातून घरी परतलेल्या कुटुंबाला बसला जबरदस्त धक्का

रोशन खैरनार
Tuesday, 20 October 2020

आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून त्यांच्या शेतामध्ये गेले होते. दुपारी दोनला आहेर घरी येताच त्यांना कुलूप आणि कडी कोयंडा तोडल्याचे आढळले. घरात प्रवेश करताच कपाट फोडलेले व सर्व समान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. नेमके काय घडले वाचा..

सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून त्यांच्या शेतामध्ये गेले होते. दुपारी दोनला आहेर घरी येताच त्यांना कुलूप आणि कडी कोयंडा तोडल्याचे आढळले. घरात प्रवेश करताच कपाट फोडलेले व सर्व समान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. नेमके काय घडले वाचा..

भरदिवसा घडलेला धक्कादायक प्रकार; कुटुंबाला शॉक 

नामपुर रस्त्यालगत पाठक मैदानावरील विजय आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीत, गेल्या मंगळवारी (ता.१३) शेतीच्या कामासाठी ते आपल्या सर्व कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून त्यांच्या शेतामध्ये गेले होते. दुपारी दोनला आहेर घरी येताच त्यांना कुलूप आणि कडी कोयंडा तोडल्याचे आढळले. घरात प्रवेश करताच कपाट फोडलेले व सर्व समान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. कपाटातील लॉकर तोडून त्यातील रोख रक्कम आणि दागिने असे एकूण ४३ हजार रूपयांचा ऐवज चोरल्याचे लक्षात आले.

कुटुंब घराबाहेर गेलेल्याचा घेतला फायदा

त्यानुसार पोलिसात फिर्यादही दिली होती. मात्र सोमवारी (ता.१९) त्यांचे वडील माणिकराव आहेर यांनी कांदा विक्रीतुन आलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम व आईचे १५ ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातले दागिने कपाटात न सापडल्याने १३ तारखेला झालेल्या घरफोडीतच हे दागिने आणि रक्कम चोरीला गेले आहेत. त्यामुळे विजय आहेर यांनी आज १ लाख ३४ हजार रुपये रोख रक्कम, ९ हजार रुपयांचे लहान मुलाचे तीन ग्रॅम सोन्याचे कानातील बाळ्या व तीन हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ४५ हजार रुपयांची १५ ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातील तोंगल असे एकूण एक लाख ८८ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीची तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

पावणे दोन लाखांवर ऐवज लंपास 

सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार गायकवाड व सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि गुन्हा दाखल केला आहे. राहत्या घराच्या दरवाजाचे भरदिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ८८ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary in Satana nashik marathi news