VIDEO : प्रवाशांनो! नाशिकच्‍या सीबीएस आणि महामार्ग बसस्‍थानकावरून सुटल्या बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

st stand nashik.jpg
st stand nashik.jpg

नाशिक :  गुरुवारपासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी अशा सर्व प्रकारच्या बससेवा (मूळ तिकीट दरात) टप्प्याटप्प्याने सुरू होत असून, त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध केल्‍या आहेत.

कासारा, बोरिवली, पुण्यासह औरंगाबाद, नंदुरबार, धुळ्यासाठी बस 

नाशिकच्‍या सीबीएस आणि महामार्ग बसस्‍थानकावरून कासारा, मुंबई, बोरिवली, पुणे, औरंगाबादसह धुळ्यासाठी बसगाड्या सोडल्‍या जाणार आहेत. प्रवाशांच्‍या सोयीनुसार बसगाड्यांची उपलब्‍धता केली जाणार आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. बसच्‍या प्रवासी क्षमतेच्‍या पन्नास टक्‍के प्रवासी वाहतूक बसने केली जाणार असून, बसचे नियमित निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. तसेच नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्‍त प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता बस फेऱ्यांच्‍या संख्येत वाढ केली जाणार आहे. प्रवाशांना मास्‍कचा वापर व अन्‍य अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. 

तालुकास्‍तरावर दर तासाला बस 
सटाणा, मालेगाव, कळवण, येवला, लासलगाव, पेठ, सिन्नर, मनमाड, नांदगाव येथून नाशिक या मार्गावर दर तासाला बस सुटणार आहे. तसेच नाशिक-पुणे, नाशिक-धुळे या मार्गावरदेखील दर तासाला बस उपलब्‍ध असेल. नाशिक-कसारा मार्गावर लोकलच्‍या वेळापत्रकानुसार बस उपलब्‍ध होतील. नाशिकहून औरंगाबाद, नगर मार्गावर प्रवाशी मागणीनुसार पुरेशा बस सोडण्यात येतील. 

जळगावातून नाशिक, औरंगाबाद फेऱ्यांचे नियोजन 
जळगाव : पाच महिन्यांनंतर एसटी डेपोतून बाहेर निघून अन्य जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. बुधवारी (ता. १९) दुपारी त्यासंबंधी आदेश आल्यानंतर जळगाव विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. प्रवाशांची संख्या व मागणीनुसार एसटी जाण्याचे मार्ग व ठिकाणे ठरवले जातील. तसेच फेऱ्याही त्याच संख्येवर ठरणार आहेत. जळगावातून औरंगाबाद, नाशिकला मोठ्या प्रमाणात फेऱ्या जातात. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस प्रवासी किती उपलब्ध होतात, त्यावर फेऱ्या अवलंबून असतील. जळगाव विभागांतर्गत सर्व आगारातून एसटीच्या फेऱ्या निघतील. प्रवाशांनुसार त्या निघणार असल्या तरी सकाळी सात ते सायंकाळी पाच, यावेळेत प्रामुख्याने एसटी धावेल. सायंकाळच्या बस हमखास सोडल्या जातील. प्रवाशांना अडकून राहावे लागणार नाही, असे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. 


बसगाड्यांचे वेळापत्रक असे  
मार्ग बसस्‍थानक वेळा 
नाशिक-धुळे नवीस सीबीएस (ठक्‍कर बझार) सकाळी ६, ८, १०, दुपारी १२, २ 
नाशिक-पुणे नवीन सीबीएस सकाळी ६, ७, ८, ९, १० 
नाशिक-औरंगाबाद नवीन सीबीएस सकाळी ८, १०, दुपारी १२ 
नाशिक-नंदुरबार जुने सीबीएस सकाळी ८, १० 
नाशिक-त्र्यंबक जुने सीबीएस सकाळी ८, १० 
नाशिक-बोरिवली महामार्ग बसस्‍थानक सकाळी ७, ९ 
नाशिक-कसारा महामार्ग बसस्‍थानक सकाळी ६, ८, १० 

नंदुरबार आगार 
नाशिक : सकाळी ८ 
धुळे : सकाळी ८  
 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com