esakal | प्रवाशांनो! नाशिकहून नागपूर, सोलापूरसाठी आजपासून बसगाड्या; अन्‍य काही मार्गांवर बससेवा
sakal

बोलून बातमी शोधा

st 2.jpg

अनलॉकच्‍या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्‍हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी सोमवार (ता. १४)पासून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांनो! नाशिकहून नागपूर, सोलापूरसाठी आजपासून बसगाड्या; अन्‍य काही मार्गांवर बससेवा

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : अनलॉकच्‍या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्‍हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी सोमवार (ता. १४)पासून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील नागपूरसाठीची साधी शयन यान बससेवा सुरू केली जात असून, या गाड्या नवीन सीबीएस बसस्थानकावरून सुटणार असल्‍याचे महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागपूर, सोलापूरसाठी आजपासून बसगाडी 
सोमवारपासून नाशिकहून रात्री आठला नागपूरसाठी साधी शयन यान बससेवा सुरू होत आहे. मालेगावहून सव्वा दहाला, धुळ्याहून बाराला, जळगावहून रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी, भुसावळहून रात्री पावणेतीनला ही बस उपलब्‍ध होईल. तसेच नागपूरहून नाशिक परत ही बस रात्री आठला सोडली जाईल. या मार्गाशिवाय अन्‍य काही मार्गांवरदेखील बससेवा सुरू होणार आहे. यात नाशिक-सोलापूर मार्गावर सकाळी साडेनऊ व रात्री आठला बस उपलब्‍ध असेल.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

अन्‍य काही मार्गांवर बससेवा, नवीन सीबीएसवरून सुटणार गाड्या 

नाशिक-अकोला मार्गासाठी सकाळी साडेआठला, नाशिक-लोणारकरिता सकाळी साडेसातला बस उपलब्‍ध असेल. नांदगाव-परळी वैजनाथकरिता सव्वानऊला गाडी सोडली जाणार आहे. नांदगाव-देऊळगाव राजाकरिता अकराला गाडी सोडली जाईल. यापूर्वीच्‍या सूचनांप्रमाणे प्रवाशां‍ना मास्‍कचा वापर बंधनकारक व सोशल डिस्‍टन्सिंगसह अन्‍य विविध उपाययोजना केल्‍या जाणार असल्‍याचेही महामंडळातर्फे स्‍पष्ट केले आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे