इगतपुरीजवळ कारची टेम्पोला मागून धडक; भीषण अपघातात 1 ठार, 4 जखमी

पोपट गवांडे
Tuesday, 29 September 2020

मुंबई-नाशिक महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्यावर गेल्या पाच सहावर्षात शेकडो प्रवाशांचे अपघातात बळी गेले.उड्डाणपुल तयार करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या चार-पाच वर्षापासुन अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी मोर्च आंदोलने छेडली. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत.

नाशिक/इगतपुरी : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्याजवळ मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका टेम्पोला स्विफ्टने मागून जोरदार धडक दिली.यात स्विफ्ट मधील 1 जण जागीच ठार झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहे. दोनच दिवसांपुर्वी याच ठिकाणी अपघातात एकाचा मृत्यु झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता.त्यामुळे पिंप्रीसदो हा मृत्युचा फाटा अशी भीती प्रवासी वर्गात झाली आहे.

चाळीसगाव येथील तरुण जागीच ठार

इगतपुरी शहराजवळील पिंप्रीसदो फाट्या जवळ मंगळवारी ( ता.29 रोजी ) सकाळी सात वाजेच्या सुमारास टेम्पो क्रमांक ( MH 04- Ck 5089 हा नाशिककडे जात असताना स्विफ्ट डिझायरने ( MH04 - fj 4905) मागून जोरदार धडक दिली. यात स्विफ्ट डिझायर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आशिष रवींद्र भावसार (वय, 22) राहणार चाळीसगाव हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर अक्षय जाधव, निकेत रणदिवे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, दीपक गायकवाड, अक्षय दामोद राहणार चाळीसगाव हे किरकोळ जखमी झाले.घटनास्थळी अपघातग्रस्तांना बाहेर काढत्या वेळी अनेकांना दोघे ठार झाल्याचे भासले मात्र जखमींना तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश वराडे, ईश्वर गंगावणे, भाबड आदी करत आहे

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

पिंप्रीसदो फाटा की मृत्युचा फाटा 

मुंबई-नाशिक महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्यावर गेल्या पाच सहावर्षात शेकडो प्रवाशांचे अपघातात बळी गेले.उड्डाणपुल तयार करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या चार-पाच वर्षापासुन अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी मोर्च आंदोलने छेडली. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. पिंप्रीसदो फाटयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे भावली धरण असल्याने मुंबईच्या अनेकांनी चढया भावात जमीनी खरेदी केल्याने उड्डानपुल झाल्यास त्यांचे दर उतरु नये म्हणून संबंधित अधिकाऱ्याना हाताशी धरले जात असल्याची परिसरात चर्चा आहे.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car and truck accident near igatpuri one killed nahik marathi news