दिवाळीत दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी; महावितरणचे आवाहन  

अंबादास शिंदे
Thursday, 12 November 2020

दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आली आहे.

नाशिक रोड : दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आली आहे. दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजीत विजेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास एखादी दुर्घटना घडू शकते. दिवाळी आनंदोत्सवाचे वातावरण एकदम दुःखात बदलायला वेळ लागत नाही. त्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

सुरक्षित दिवाळीसाठी महावितरणचे आवाहन 
मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर, तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीजतारा वापरू नयेत किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करून घ्याव्यात. तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत. घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. आपातकालीन परिस्थितीत महावितरण कार्यालयात, महावितरणच्या १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.  

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Care should be taken to avoid unfortunate incidents on Diwali nashik marathi news