esakal | जेव्हा नगरसेवक स्वत:च संचारबंदी उल्लंघन करतात तेव्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

dipak datir 123.jpg

याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमध्ये दीपक दातीर त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका युवतीने काढला असून, तिने हिमतीने याबाबत नगरसेवकांना जाब विचारला असताना उडवाउडवीची उत्तरे दिली.

जेव्हा नगरसेवक स्वत:च संचारबंदी उल्लंघन करतात तेव्हा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक व सिडको सभापती यांच्यासह त्यांच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक व सिडको सभापती दीपक दातीर यांच्यासह त्यांच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक दीपक दातीर यांनी शासनाच्या संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत मित्रांसमवेत क्रिकेटचा डाव मांडला. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमध्ये दीपक दातीर त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका युवतीने काढला असून, तिने हिमतीने याबाबत दातीर यांना जाब विचारला असताना उडवाउडवीची उत्तरे दिली. संचारबंदीत चारपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क लावावा, हे सर्व नियम दातीर यांनी धाब्यावर बसविले. 

हेही वाचा > PHOTOS : नमस्कार, मी सुप्रिया सुळे बोलते ! तुम्ही खूप चांगलं काम केलं.. तुमचं कौतुक अन् आभारही!"

या प्रकरणी सभापती दीपक दातीर यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापुढे न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. -कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड 

हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!