esakal | अखेर तरुणीच्या संयमाचा बांध तुटला; रिपोर्टमधल्या खुलाशाने प्रकार उघड
sakal

बोलून बातमी शोधा

crime,.jpg

पोटात दुखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. तपासात अल्पवयीन तरुणी गर्भवती असल्याचा रिपोर्ट हातात आला. तरुणीला विचारणा केली असता तिचा अखेर संयमाचा बांध तुटलाच. वाचा काय घडले?

अखेर तरुणीच्या संयमाचा बांध तुटला; रिपोर्टमधल्या खुलाशाने प्रकार उघड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) पोटात दुखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. तपासात अल्पवयीन तरुणी गर्भवती असल्याचा रिपोर्ट हातात आला. तरुणीला विचारणा केली असता तिचा अखेर संयमाचा बांध तुटलाच. वाचा काय घडले?

अशी आहे घटना
  
शहरातील सनाउल्लानगर भागातील पंधरावर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. तिच्याशी सलगी व ओळख वाढवून तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. याप्रकरणी एजाज खान ऊर्फ बंटी शराफत खान (रा. सनाउल्लानगर) या तरुणाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत सहा महिन्यांपूर्वी एजाज ऊर्फ बंटीने तिच्याशी ओळख करून सलगी वाढवली. त्यानंतर वेळोवेळी धमकी देत लैंगिक अत्याचार केले. संबंधित तरुणीचे पोट दुखू लागल्याने तिच्या सावत्र आईने तिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले असता, मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. 

हेही वाचा >  हॉटेलमधील आचाऱ्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य; संशयास्पद घटनेचा पोलीसांकडून शोध सुरू

तरुणाविरुद्धात गुन्हा दाखल

अल्पवयीन तरुणीचा फायदा घेत केलेल्या या गुन्ह्याप्रकरणी पीडिेतेने एजाजविरुद्ध तक्रार दिली. आझादनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक दशरथ पारेकर, उपनिरीक्षक माने संशयिताचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा > रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या