esakal | सुरक्षारक्षकाने पोलीओ डोस पाजल्यानंतर संबंधितांना "कारणे दाखवा नोटीस; वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

बोलून बातमी शोधा

polio dose suraksha rakshak.jpg}

बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वैद्यकीय विभागातील या गलथान कारभाराची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी रास्त मागणी बालकांच्या पालकांनी वैद्यकीय विभागाकडे केली आहे. आता या चौकशीत तरी वैद्यकीय विभागाचा गलथान कारभार दिसू नये म्हणजे मिळवलं..!

सुरक्षारक्षकाने पोलीओ डोस पाजल्यानंतर संबंधितांना "कारणे दाखवा नोटीस; वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : "दो बूँद जिंदगी के" म्हणत दस्तरखुद्द सुरक्षारक्षकानेच बालकांना पल्स पोलिओ चे डोस पाजल्याचे प्रकरण "दैनिक सकाळ" ने सचित्र उजेडात आणताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना "कारणे दाखवा नोटीस" बजावत सदर प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वैद्यकीय विभागाच्या या गलथान कारभाराची चांगलीच चर्चा यानिमित्ताने शहरात ऐकायला मिळत आहे. या प्रकरणासंबंधी हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य सेविकांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी चांगलेच फटकारल्याचे समजते.

वैद्यकीय विभागाच्या गलथान कारभाराची चांगलीच चर्चा
नाशिकसह सिडकोत पल्स पोलिओचा आरोग्यमय कार्यक्रम राबविण्यात आला. दरम्यान त्रिमूर्ती चौकातील पेठे शाळेच्या केंद्रामध्ये दुपारच्या वेळेला आरोग्य सेविका जागेवर उपस्थित नसल्याने येथील सुरक्षारक्षकानेच  येणाऱ्या जाणाऱ्या पालकांच्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस देत असल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले. यासंदर्भात दैनिक सकाळने सदर घटनेचा "पर्दाफाश" केला. त्यामुळे मनपा वैद्यकीय विभागात चांगलीच "खळबळ" उडाली. सकाळच्या बातमीची दखल घेत संबंधितांना मनपा वैद्यकीय विभागाने "कारणे दाखवा" नोटीस बजावली असून वरिष्ठांकडून पुढील चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सिडकोतील मनपा स्वामी समर्थ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन बाजी यांनी दिली आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

चौकशी होऊन कारवाई व्हावी; पालकांची मागणी 
या प्रकरणासंबंधी हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य सेविकांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी चांगलेच फटकारल्याचे समजते. बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वैद्यकीय विभागातील या गलथान कारभाराची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी रास्त मागणी बालकांच्या पालकांनी वैद्यकीय विभागाकडे केली आहे. आता या चौकशीत तरी वैद्यकीय विभागाचा गलथान कारभार दिसू नये म्हणजे मिळवलं..!

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच