esakal | जिल्ह्यातील कोविड सेंटरवर सीसीटीव्हीद्वारे नजर! डिस्प्ले टीव्ही थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात
sakal

बोलून बातमी शोधा

covid center 123.jpg

जिल्‍हाभरातील कोविड सेंटरवर नजर ठेवण्यासाठी व तेथील रुग्ण व त्यांच्या उपचारांमधील पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोविड सेंटरवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असल्‍याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

जिल्ह्यातील कोविड सेंटरवर सीसीटीव्हीद्वारे नजर! डिस्प्ले टीव्ही थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍हाभरातील कोविड सेंटरवर नजर ठेवण्यासाठी व तेथील रुग्ण व त्यांच्या उपचारांमधील पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोविड सेंटरवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असल्‍याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

जिल्ह्यातील कोविड सेंटरवर सीसीटीव्हीद्वारे नजर 
जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावरील स्वतंत्र कोविड उपचार केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील चार मजली कुंभमेळा इमारतीत सुरू आहेत. तेथील रुग्णांना मिळणाऱ्या उपचार व पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर देखरेख व निगराणी ठेवली जाणार आहे. यासाठी चार मजली कोविड उपचार रुग्णालय, त्यातील वरांडा व उद्‌वहन (लिफ्ट) यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दयानंद बहात्रे यांना बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज विभागाद्वारे आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण केली आहे.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

डिस्प्ले टीव्ही थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात

या कामासाठी लागणाऱ्या चार लाख ५३ हजार रुपयांच्या निधीला त्वरित मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने सार्वजनिक वीज विभागाद्वारे हे काम तत्परतेने पूर्ण केले असून, एकूण वीस सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. तसेच सीसीटीव्ही डिस्प्ले टीव्ही थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात लावले आहेत. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालयातील सर्व कोविड वॉर्ड, अतिदक्षता कक्ष, वरांडा, उद्‌वहन यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा शल्यचिकित्सकांची थेट निगराणी असेल.  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

संपादन - ज्योती देवरे