जिल्हाधिकारी म्हणताएत...'कोरोनाचे भान ठेवूनच आगामी उत्सव साजरे करावेत'

प्रमोद सावंत
Tuesday, 18 August 2020

श्री.मांढरे यांनी शहर व परिसरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने आपत्कालीन कार्य केंद्राची तातडीची बैठक घेतली. खासगी आस्थापनांना सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत मुभा द्यावी. यंत्रमागधारक व वैद्यकीय आस्थापनांना यातून सवलत द्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. 

नाशिक/मालेगाव : मालेगाव पॅटर्नचा देशपातळीवर गवगवा झाला. शहरवासीय त्यास पात्र आहोत. मात्र अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. शहरवासीयांनी कोरोना संसर्गाचे भान ठेवूनच आगामी सण-उत्सव साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी (ता. १७) येथे केले. त्याचवेळी प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास बंदी कायम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 

शासन निर्देशांचे पालन करावे

श्री. मांढरे म्हणाले, की मनपाने प्रभाग निहाय गणपती विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. सार्वजनिक मंडळांनी मंडप व मुर्तीची उंची कमी ठेवावी. विसर्जनासाठी मिरवणुकीला प्रतिबंध आहे. घरात राहून सण उत्सव साजरे करावेत. आगामी काळात कोरोनाचा फैलाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रीमती सिंह यांनी शहरवासीयांचे सहकार्य कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमोद शुक्ला, दिपक सावळे यांनी गणेश मंडळ शासन निर्देशांचे पालन करतील असे सांगितले. 

ताजीया समिती सदस्यांशी संवाद 

सुसंवाद हॉलमध्ये श्री. मांढरे यांनी मोहरमच्या पार्श्वभूमीवर ताजीया समिती सदस्यांशी संवाद साधत ताबूतच्या मिरवणुकीवरही बंदी असून शासन निर्देशांचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी समिती सदस्य शफीक राणा, जावेद अन्वर, रियाज हुसेन आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री.मांढरे यांनी शहर व परिसरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने आपत्कालीन कार्य केंद्राची तातडीची बैठक घेतली. खासगी आस्थापनांना सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत मुभा द्यावी. यंत्रमागधारक व वैद्यकीय आस्थापनांना यातून सवलत द्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. 

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

यांची प्रमुख उपस्थिती

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे सायंकाळी व मोहरमच्या पार्श्वभूमीवर दुपारी नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमधील बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक संदिप घुगे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, महापालिका आयुक्त ञ्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, रत्नाकर नवले, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले, डॉ. गोविंद चौधरी आदींसह गणेश मंडळाचे पदाधिकारी व मुस्लीम समाजबांधव, मोहरम ताजिया कमिटीचे प्रमुख उपस्थित होते. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate the festival with Corona in mind - Collector nashik marathi news