esakal | जिल्ह्यात 'या' सहा ठिकाणी सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा...कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

central oxygen.jpg

सद्यःस्थितीत वापरात असलेल्या आठ केंद्रांमध्ये ४५० खाटा असून, त्यातील साडेतीनशे खाटांसाठी सेंट्रल ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी सेंट्रल ऑक्सिजन​चे काम पूर्ण होईपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था राहणार आहे. 

जिल्ह्यात 'या' सहा ठिकाणी सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा...कुठे ते वाचा

sakal_logo
By
महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रत्येक तालुक्यात एक, याप्रमाणे १५ समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी सहा ठिकाणी सेंट्रल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी सेंट्रल ऑक्सिजनचे काम पूर्ण होईपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था राहणार आहे. कुठे ते वाचा

ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था राहणार

नगरसूल, लासलगाव, सिन्नर, पिंपळगाव बसवंत, झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयातील केंद्राचा, तर वणीच्या ट्रॉमा केअर सेंटरचा समावेश आहे. याशिवाय इगतपुरी, चांदवडमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सेंट्रल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येत आहे. मनमाडमधील रेल्वे रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात येणार आहे. समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये ५४० खाटांची व्यवस्था आहे. सद्यःस्थितीत वापरात असलेल्या आठ केंद्रांमध्ये ४५० खाटा असून, त्यातील साडेतीनशे खाटांसाठी सेंट्रल ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी सेंट्रल आॅक्सिजनचे काम पूर्ण होईपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था राहणार आहे. 

लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेतील समन्वय

दरम्यान, कोरोनावरील उपाययोजनांमध्ये लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेतील समन्वयावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक त्यांनी मंगळवारी (ता. २८) नाशिक आणि इगतपुरीमध्ये, तर बुधवारी (ता. २९) सिन्नर व निफाडमध्ये घेतली. सिन्नरमधील बैठकीसाठी पंचायत समितीच्या सभापती शोभाताई बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता-बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्यधिकारी डॉ. मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, संगीता पावसे, भगवान पथवे, सुमन बर्डे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > घरखर्च भागविण्यासाठी वडिलांसोबत लावले पिको-फॉल...भाग्यश्रीच्या यशाने आईच्या कष्टाला कोंदण! 

ॲपची सुरवात
 
कोरोना रुग्ण शोधणे व उपचार होण्यासाठी ‘सच प्रणाली’ ऑनलाइन ॲपची सुरवात श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. ॲपद्वारे शारीरिकदृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असल्यास ते रुग्ण तत्काळ शोधण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोरोना आजारावर मात करण्यासाठी ॲपचा उपयोग होणार आहे. ॲपद्वारे विविध आजाराने बाधित रुग्णास कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याने अशा रुग्णांना विशेष आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यास मदत होईल. हे ॲप सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. मग जिल्हाभरात त्याचा वापर होईल. ॲपसाठी जिल्ह्याची अग्रणी बँक तथा बँक ऑफ महाराष्ट्रने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून दिला. श्रीमती बनसोड यांनी बँकेचे आभार मानले.  

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

संपादन - किशोरी वाघ