esakal | मी स्वत:ही नारायण राणेंच्या संपर्कात - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal and narayan rane.jpg

"नारायण राणे यांनी 35 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे," त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं. त्यावर भुजबळ म्हणाले, "ठिक आहे, मी आनंदी आहे. मी स्वत: सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे.  मग आता काय करणार.

मी स्वत:ही नारायण राणेंच्या संपर्कात - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : "नारायण राणे यांनी 35 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे," त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं. त्यावर भुजबळ म्हणाले, "ठिक आहे, मी आनंदी आहे. मी स्वत: सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे.  मग आता काय करणार. एकमेकांशी बोलतो, सगळं संपर्कात आहेत" भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे 35 आमदार नाराज असून, ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत  छगन भुजबळ यांनी मिश्किल उत्तर दिलं. हसत हसत भुजबळ म्हणाले, मी स्वत:ही त्यांच्या संपर्कात आहे. 

नारायण राणे काय म्हणाले होते?
“भाजप कोणाकडे गेले नव्हते, शिवसेना स्वतः आली होती. भाजप केंद्रात आहे, महाराष्ट्रातदेखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. 54 पैकी 35 त्यांच्याकडेच नाराज आहेत.  या सरकारला कायमची सत्ता दिली नाही, आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ” असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी शनिवारी ठाण्यातील मालवणी महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी राणे यांनी राजकीय भाष्य करणार नाही म्हणत, महाविकास आघाडीवर टीकास्त्रच सोडलं होतं. इतकंच नाही तर भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. 54 पैकी 35 त्यांच्याकडेच नाराज आहेत, असा दावा यावेळी राणेंनी केला होता.

हेही वाचा > फडणवीसांना सांगा, आमच्यावरही भरोसा ठेवा - छगन भुजबळ

हेही वाचा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..