esakal | फडणवीसांना सांगा, आमच्यावरही भरोसा ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Bhujbal 123.jpg

पालकमंत्री भुजबळ यांनी आमदार फरांदे यांच्या भाषणातील फडणवीसांच्या भरोसा सेलवरून सुरवात केली. वाक्‍या वाक्‍यातून कानपिचक्‍या दिल्या. भुजबळ यांनी, सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार नवनवीन उपक्रम राबविते. फडणवीसांनी भरोसा सेल राबविला. पण त्यांना सांगा आमच्यावरही भरोसा ठेवा, असे म्हणत फडणवीसांकडून होणाऱ्या महाआघाडी सरकारवरील सततच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.  

फडणवीसांना सांगा, आमच्यावरही भरोसा ठेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काळातील सरकारने चांगले कामं केली. प्रत्येक सरकारचे ते दायित्वच असते. भरोसा सेल सुरू करण्यावर त्यांचा भरोसा आहे. चांगली गोष्ट आहे. पण फडणवीसांना सांगा, आमच्यावरही भरोसा ठेवा, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र त्याचवेळी, पोलिसांचे आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच पैसे देते; पण गेला ना परत त्याचं काय, असा सवाल उपस्थित करीत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. 

भुजबळांच्या आमदार फरांदे यांना कानपिचक्‍या 
आमदार फरांदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये महिलांच्या सुरक्षितता आणि त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने भरोसा सेल सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई, पुण्यात हे सेल झाले. नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आपण प्रयत्नशील होता, असे सांगितले. पालकमंत्री भुजबळ यांनी आमदार फरांदे यांच्या भाषणातील फडणवीसांच्या भरोसा सेलवरून सुरवात केली. वाक्‍या वाक्‍यातून कानपिचक्‍या दिल्या. भुजबळ यांनी, सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार नवनवीन उपक्रम राबविते. फडणवीसांनी भरोसा सेल राबविला. पण त्यांना सांगा आमच्यावरही भरोसा ठेवा, असे म्हणत फडणवीसांकडून होणाऱ्या महाआघाडी सरकारवरील सततच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.  

नक्की बघा > PHOTOS : अकराव्या वर्षी समजले किन्नर झाल्याचे...अन् थेट झाली लोकांची आयडॉल!

हेही बघा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..