एकीकडे रुग्णांची हेळसांड; चांदवडला मात्र केंद्राकडील २५ व्हेंटिलेटर धूळखात? पाहा VIDEO

हर्षल गांगुर्डे
Friday, 18 September 2020

गुरुवारी (ता. १७) चांदवड येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर उघडकीस आला. राज्य सरकारने हा भोंगळ कारभार व रुग्णांच्या जिवाशी सुरू केलेला खेळ आता थांबवावा, अशी मागणी आमदार आहेर यांनी या वेळी केली. जिल्ह्यात दुसऱ्यांदा असा प्रकार उघडकीस आल्याने शासकीय यंत्रणेचा जीवघेणा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 

नाशिक : (गणूर) संपूर्ण राज्यात व्हेंटिलेटर बेड नाही म्हणून खासगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होत असताना दुसरीकडे केंद्राकडून आलेली २५ व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार आमदार डॉ. राहुल आहेर यांनी गुरुवारी (ता. १७) चांदवड येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर उघडकीस आला. जिल्ह्यात दुसऱ्यांदा असा प्रकार उघडकीस आल्याने शासकीय यंत्रणेचा जीवघेणा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 

यंत्रणेचा जीवघेणा कारभार

पहिल्या टप्प्यात नेमिनाथ जैन संस्थेच्या चोरडिया रुग्णालयात सुरू केलेले कोविड सेंटर नुकतेच चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे, अनेक रुग्ण घरीच, तर काही रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णांची विचारपूस व कोविड सेंटरची पाहणी या उद्देशाने गुरुवारी (ता. १७) आमदार आहेर यांनी अचानक कोविड सेंटरला भेट दिली तेव्हा व्हेंटिलेटरबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केंद्राने दिलेली लाखो रुपयांची व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याचे लक्षात येताच कोविड सेंटरचे डॉ. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे याबाबत आमदारांनी विचारणा केली. यात या नव्या मात्र सुरू न करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबत वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

स्वॅब घेण्याचे प्रमाणदेखील कमी

दुसरीकडे चांदवड तालुक्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. शिवाय रोज स्वॅब घेण्याचे प्रमाणदेखील कमी असल्याचा आरोप आमदार आहेर यांनी केला. यामुळे चांदवड कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबतचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या वेळी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. सुशील शिंदे, डॉ. आदित्य निकम, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे, गणेश महाले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शांताराम भवर, सुभाष पुरकर, आरपीआयचे राजाभाऊ आहिरे, विजय धाकराव उपस्थित होते.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandwad received from the Center 25 ventilators are lying in the dust nashik marathi news